Sanjay Jadhav statement : खासदार संजय जाधव यांचा मोठा खुलासा, परभणी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी अजित पवारांचा मला फोन आला होता..

Parbhani mayor election News : परभणी महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांनी एकत्रित आघाडी केली होती.
Sanjay Jadahv, Ajit Pawar
Sanjay Jadahv, Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Parbhani Shivsena UBT News : परभणी महापालिकेचा निकाल लागल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 25 जानेवारीला मला फोन आला होता. गंगाखेड दौऱ्यावर असताना त्यांनी महापालिकेसाठी काय विचार केलाय ? आपण बसायचं का? अशी विचारणा त्यांनी मला केली होती, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केला. परंतु नंतर बारामती येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात अजितदादांचे निधन झाले आणि ही चर्चा होऊ शकली नाही, असे जाधव यांनी स्पष्ट केले.

परभणी महापालिका निवडणुकीत शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस यांनी एकत्रित आघाडी केली होती. या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची एकूण संख्या 37 म्हणजेच बहुमतापेक्षा जास्त आहे. त्यामुळे परभणी महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महौपार आणि काँग्रेसचा उपमहापौर बसणार हे निश्चित समजले जात आहे. चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसऐवजी भाजपला पाठिंबा दिल्याने परभणीतील शिवसेना-काँग्रेस आघाडीवर परिणाम होईल, अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Sanjay Jadahv, Ajit Pawar
Pune BJP : पुण्याच्या राजकारणातील मोठी घडामोड, भाजपचा बंडखोरांना हिसका; 69 जणांचे निलंबन, संपूर्ण यादीच वाचा!

या पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव (Sanjay jadhav) यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्यांवर भाष्य केले. परभणीत शिवसेना-काँग्रेसची आघाडी निवडणुकीपूर्वीची आहे. दोन्ही पक्षामध्ये, नेत्यांमध्ये समन्वय आहे. चंद्रपूरमधील घटनेचा परिणाम इथे होणार नाही, कुठल्याही परिस्थितीत परभणी महापालिकेत मशालीचाच महापौर बसणार, असा दावा जाधव यांनी केला. याचवेळी त्यांनी महापालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अजित पवारांचा आपल्याला 25 जानेवारी रोजी फोन आला होता, असे सांगितले.

Sanjay Jadahv, Ajit Pawar
Shivsena Politics : शिवसेनेत घराणेशाही! शिंदेंच्या आमदाराची पाची बोटं तूपात, पत्नी अन् सुनही ZPत

गंगाखेड दौऱ्यात असताना अजित पवारांनी मला फोनवरून परभणी महापालिकेतील सत्तेसंदर्भात काय विचार केला आहे? आपण सोबत बसायचं का? अशी विचारणा केली. यावर मी, आमची आणि काँग्रेस पक्षाची आघाडी ही निवडणुकीआधीची आहे. त्यामुळे आपण चर्चा करायला किंवा सोबत बसायला मला हरकत नाही. पण काँग्रेसला सोडून आपल्याला चर्चा करता येणार नाही. त्यांना सोबत घेऊन आपण चर्चा करू शकतो, असे मी त्यांना म्हणालो होतो. परंतु त्यानंतर काही दिवसांनीच अजितदादांचा बारामती येथील दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झाला आणि हा विषय संपला, असे संजय जाधव यांनी सांगितले.

Sanjay Jadahv, Ajit Pawar
Shivsena Vs Ncp : ‘जिंकूनही हरली’ शिवसेना! रायगडात गोगावलेंनी पत्ते उघडताच तटकरेंनी डाव साधला

महापालिकाच नाही, झेडपीतही जोर लावणार..

परभणी महापालिकेत मशालीचाच महापौर होणार असा दावा करतानाच तुम्ही फक्त महापालिकेचे काय घेऊन बसलात आम्ही जिल्हा परिषदेतही प्रयत्न करत आहोत, असे संजय जाधव यांनी स्पष्ट केले. काँग्रेससोबत आमची आघाडी आहे, सगळे नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा दगाफटका होणार नाही, याचा मला विश्वास आहे, असेही जाधव म्हणाले.

Sanjay Jadahv, Ajit Pawar
Congress Vs BJP : 'अशोक चव्हाण खुर्चीत, नगराध्यक्ष उभे...'; काँग्रेस प्रवक्त्याने 'चव्हाण', 'देशमुख' पॅटर्नमधील फरक सांगितला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com