

Shivsena-AIMIM : संजय राऊत यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर २५ कोटी रुपयांच्या एका प्रस्तावाला मंजूरी देण्यासाठी पाच कोटींची लाच मागितल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी या वादात उडी घेत संजय शिरसाट मंत्री पदाचा कार्यकाळ संपताच भाजपामध्ये जाणार असल्याचा दावा करत नवा फटाका फोडला आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी, पुरावे देवून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय शिरसाट यांच्यावर कारवाई केली नाही. कारण भाजपा हा देशातला असा एकमेव पक्ष आहे, ज्यांच्याकडे कितीही भ्रष्टाचारी नेता, मंत्री, आमदार, खासदार असला तरी तो त्यांच्याकडे असलेल्या मशिनमध्ये धुवून स्वच्छ होतो. मग त्याला भाजपामध्ये प्रवेश दिला जातो. त्याच प्रमाणे संजय शिरसाट हे देखील त्यांच्या मंत्रीपदाचा कार्यकाळ संपताच भाजपामध्ये प्रवेश करतील, असा दावा इम्तियाज जलील यांनी केला.
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाला दुजोरा देताना इम्तियाज जलील यांनी अशा तक्रारदारांची संख्या वाढणार असून लोकांचे पैसे बुडणार आहेत, असे म्हटले आहे. समाजकल्याण विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे हे प्रामाणिक अधिकारी असल्याने ते बोगस प्रस्तावांना मंजुरी देणार नाहीत, त्यामुळे आधीच पैसे घेऊन बसलेल्या शिरसाट यांना घरी जावे लागेल. मंत्रीपद जाण्याआधी जेवढे काही गुंडाळता येईल, तेवढे गुंडाळण्याचा संजय शिरसाट यांचा प्रयत्न आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संरक्षण असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, असा आरोप करत इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला. 50 खोके घेऊन शिवसेनेला दगा दिल्याप्रमाणे ते एकनाथ शिंदे यांनाही दगा देऊन भाजपमध्ये जातील. भाजपकडे अशा लोकांसाठी वॉशिंग मशीन असल्याचा टोलाही इम्तियाज जलील यांनी लगावला. एसीबीने चौकशी करण्याची परवानगी मागितली असतानाही, फडणवीस यांनी ती रोखल्याचा आरोपही त्यांनी केला. शिरसाट यांना भाजपमध्ये येण्यासाठी भाग पाडण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावाही इम्तियाज यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.