Beed ZP : बीड जिल्हा परिषदेतील कथित गैरव्यवहारांची चौकशी, मुळ कागदपत्रे सादर करण्याचे सीईओंना आदेश!

Beed Zilla Parishad alleged irregularities investigation : बीड जिल्हा परिषदेमधील कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. चौकशीसाठी मूळ कागदपत्रे सादर करण्याचे आदेश सीईओंना देण्यात आले आहेत.
Beed Zilla Parishad alleged irregularities investigation
Beed Zilla Parishad alleged irregularities investigationSarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed Politics : नियमबाह्य पदोन्नती, मर्जीतील अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार, निलंबित कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती, दिव्यांग आरक्षणातील कथित अनियमितता आणि कोट्यवधी रुपयांच्या निधी वितरणातील गैरव्यवहार अशा विविध आरोपांमुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्हा परिषदेच्या कारभाराची आता उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे.

या प्रकरणातील तक्रारींची गंभीर दखल घेत चौकशी अधिकारी तथा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिन्नू यांनी बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. संबंधित सर्व मूळ अभिलेखे आणि संचिका २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रत्यक्ष सादर करण्याचे निर्देश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.

आष्टी तालुक्यातील केवडाई येथील तक्रारदार राम सूर्यभान खाडे यांनी १९ मे, २६ मे आणि १ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन तसेच विभागीय आयुक्तांकडे विविध पुराव्यांसह तक्रारी दाखल केल्या होत्या. बांधकाम आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविणे, बीड, आष्टी, पाटोदा आणि गेवराई पंचायत समित्यांमध्ये गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार नियमबाह्य पद्धतीने देणे, तसेच निलंबित आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रतिनियुक्ती देणे, असे गंभीर आक्षेप या तक्रारींमध्ये नोंदविण्यात आले आहेत.

Beed Zilla Parishad alleged irregularities investigation
IPS officers transfer : उत्तर प्रदेश पोलीस दलात मोठा भूकंप; 10 IPS अधिकाऱ्यांची रातोरात उचलबांगडी

याशिवाय शिक्षण विभागातील पदोन्नती प्रक्रिया, न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असतानाही काढण्यात आलेले आदेश, दिव्यांग आरक्षणातून झालेल्या नियुक्त्यांची अपुरी पुनर्तपासणी आणि स्वातंत्र्यसैनिक पाल्य कोट्यातील कथित बोगस नियुक्त्यांचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. दिव्यांग आरक्षणातून नियुक्त झालेल्या सुमारे दीड हजार शिक्षकांपैकी वैद्यकीय पुनर्तपासणीसाठी केवळ २०० जणांची यादी पाठविण्यात आल्याचा आक्षेपही तक्रारीत घेण्यात आला आहे.

कोट्यावधींची बीलं उचलंली..

स्वच्छ भारत मिशनच्या निधी वितरणात पदभार बदलल्यानंतरही जुन्या लॉगिन आयडी आणि डिजिटल स्वाक्षरीचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच धारूर तालुक्यातील हंगामी वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवून दाखवून कोट्यवधी रुपयांची बिले उचलल्याची तक्रारही चौकशीच्या केंद्रस्थानी आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बजावलेल्या ३० पेक्षा अधिक कारणे दाखवा नोटिसा आणि त्यानंतर करण्यात आलेली कारवाई दडपण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Beed Zilla Parishad alleged irregularities investigation
Pune firing case : पुण्यातील कोर्टाबाहेरच्या गोळीबारातील पहिल्या आरोपीची ओळख पटली : कात्रजमधील हत्या प्रकरणाचं कनेक्शन समोर

यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान जिल्हा परिषदेने सादर केलेल्या खुलाशातून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नसल्याचे समोर आले. त्यामुळे आता केवळ खुलाशांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष मूळ कागदपत्रांच्या आधारे प्रकरणाची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व संबंधित अभिलेखे आणि संचिका सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२५ नोव्हेंबरपर्यंत कोणती कागदपत्रे सादर होतात, संबंधित अधिकाऱ्यांची नेमकी काय भूमिका समोर येते आणि तक्रारींमधील कथित गैरव्यवहारांचे वास्तव काय आहे, यावर या चौकशीची दिशा अवलंबून राहणार आहे. त्यामुळे बीड जिल्हा परिषदेच्या कारभारातील कथित अनियमिततांचा उलगडा होतो का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.