Aurangabad West Assembly Election 2024 Counting : औरंगाबाद पश्चिममध्ये शिंदेंचे शिलेदार संजय शिरसाट आघाडीवर

Sanjay Shirsat is leading in Aurangabad West : पहिल्या फेरीत राजू शिंदे यांनी संजय शिरसाट यांच्यावर 519 मतांची आघाडी घेतली. मात्र ही आघाडी शिंदे यांना पुढे टिकवता आली नाही. त्यानंतरच्या सलग पाच फेऱ्यांमध्ये संजय शिरसाट यांनी राजू शिंदे यांच्यावरील आघाडी कायम ठेवली.
Aurangabad West Assembly Constituency
Aurangabad West Assembly ConstituencySarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर विधानसभेच्या पश्चिम मतदार संघातून अपेक्षेप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय शिरसाट हे सहाव्या फेरी अखेर 8335 मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाविकास आघाडीचे राजू शिंदे यांच्याशी शिरसाट यांची थेट लढत होती.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

निवडणूक प्रचारा दरम्यान राजू शिंदे यांनी संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना जेरीस आणल्यामुळे या मतदारसंघात वेगळा निकाल लागणार, अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून मतदार संघात सुरू होती. आज प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या फेरीत राजू शिंदे यांनी संजय शिरसाट यांच्यावर 519 मतांची आघाडी घेतली. मात्र ही आघाडी शिंदे यांना पुढे टिकवता आली नाही.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा

Aurangabad West Assembly Constituency
Aurangabad West Assembly Election : माझ्या मागे आता ठाकरे ब्रॅड, मैदान मारणारच- राजु शिंदे

त्यानंतरच्या सलग पाच फेऱ्यांमध्ये संजय शिरसाट यांनी राजू शिंदे यांच्यावरील आघाडी कायम ठेवली. संजय शिरसाठ यांची आघाडी सहाव्या फेरीपर्यंत सुरू होती. (Shivsena) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शहरातील पूर्व, पश्चिम आणि मध्य या मतदारसंघांमध्ये महायुतीचे एकमेव संजय शिरसाट हे सध्या आघाडीवर आहेत.

Aurangabad West Assembly Constituency
Aurangabad West Assembly Constituency : संजय शिरसाट यांना जनेतचे दुःख समजते, तोच खरा नेता : जोगेंद्र कवाडे

सहाव्या फेरी अखेर संजय शिरसाट हे 8335 मतांनी आघाडीवर आहेत. संजय शिरसाट यांना पहिल्या फेरीत 5105, दुसरी फेरी ,10802 तिसरी फेरी 15447, चौथ्या फेरीत 20863, पाचवी फेरी 25708, तर सहाव्या फेरीत 29164 एवढी मते मिळाली.

Aurangabad West Assembly Constituency
Mahayuti Politics: वरिष्ठ नेते अपक्षांच्या संपर्कात? "या" पाच मतदारसंघात अपक्ष ठरणार किंग मेकर!

तर त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे राजू शिंदे यांना पहिली फेरी 5662, दुसरी फेरी 8239, तिसरी फेरी 10620, चौथी फेरी 13110, पाचवी फेरी, 16272 तर सहाव्या फेरीत 20829 एवढी मते मिळाली आहेत. तीन टर्म पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार असलेले आणि चौथ्यांदा महायुतीकडून उमेदवारी मिळालेले संजय शिरसाट यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोठे आव्हान देण्यात आले आहे.

Aurangabad West Assembly Constituency
Mahavikas Aghadi : 'मी हे मान्य करणार नाही...'; काँग्रेसच्या नेतृत्वात 'मविआ'चं सरकार, पटोलेंच्या 'त्या' वक्तव्यावर राऊतांचा आक्षेप

2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या राजू शिंदे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणुक लढवली होती. पण त्यावेळी यश न मिळालेल्या शिंदे यांनी आता उद्धव ठाकरेंच्या पक्षात थेट प्रवेश करत उमेदवारी मिळवली. पश्चिम मध्ये तुल्यबळ उमेदवार असल्याने इथे मैदानात तिसरा प्रबळ असा कुठला पक्ष नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com