Shivsena Vs BJP : भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांच्या जागांवरही शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, पुण्यात जागावाटपावरून नवा वाद?

Pune Shivsena Politics : भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांच्या जागांवरही शिंदेंच्या शिवसेनेने दावा केला केल्यामुळे या जागांवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्यावतीने गुरुवारी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी महापालिका निवडणुकीच्या तयारीची माहिती देण्यात आली.
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 02 Jan : विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून आणि निकालानंतर खातेवाटपावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील वाद लपून राहिला नव्हता. शिवाय एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) हवं असणारं गृहखातं देखील भाजपने सोडण्यास नकार दिल्याने शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात निकालानंतर भाजपने डावलल्याची भावना आहे.

मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना (Shivsena) जागावाटपावरून भाजपची कोंडी करण्याची शक्यता आहे. त्यासाठी आता शिवसेनेकडून तयारी देखील करण्यात आली आहे. कारण महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून शहरातील 35 ते 40 जागा लढविल्या जातील.

शिवसेनेने यापूर्वी लढलेल्या जागांवर शिवसेनेचा हक्क असल्यामुळे त्या जागांवर शिसेनेचेच उमेदवार निवडणूक लढवतील, अशी भूमिका शिवसेनेचे पुणे (Pune) शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी स्पष्ट केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तसंच भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांच्या जागांवरही शिंदेंच्या शिवसेनेने दावा केला केल्यामुळे या जागांवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Abdul Sattar News : ना धनुष्यबाण, ना भगवा झेंडा; अब्दुल सत्तार प्रासंगिक करार मोडण्याच्या दिशेने!

शिवसेनेच्यावतीने गुरुवारी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी महापालिका निवडणुकीच्या तयारीची माहिती देण्यात आली. यावेळी पक्षाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अजय भोसले यांच्यासह महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या. या पत्रकार परिषदेत बोलताना, 2017 च्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेने जितक्‍या जागांवर निवडणूक लढविली आहे. तेवढ्या जागांवर आता आम्ही निवडणूक लढवणार असल्याचं नाना भानगिरे यांनी स्पष्ट केलं.

ते म्हणाले, "शहरातील सर्व प्रभागांमध्ये निवडणुक लढविण्याच्यादृष्टीने आमच्या पक्षाच्या बैठका सुरु आहेत. मतदार नोंदणी, संपर्क अभियान राबविलं जात आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेने जितक्‍या जागांवर निवडणूक लढविली तितक्‍या 35 ते 40 जागांवर आम्ही निवडणूक लढवणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्षांचं ऐकलं आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Shiv Sena Vs BJP : ठाकरेंच्या नेत्यांच्या भाजप प्रवेशानंतर शिंदे सेना आक्रमक; महायुतीत वादाची ठिणगी

त्यानंतर आहम्ही धनुष्यबाण चिन्हावर आम्ही निवडून आलो, त्या जागांसाठी आम्ही आग्रही आहोत. तीच पद्धत महापालिका निवडणुकीसाठीही वापरली जाईल. शेवटी पक्षाचे वरिष्ठ जे निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे यांच्यासह महायुतीमधीलही अनेकजण आमच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com