Chhatrapati Sambhajinagar News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी महायुती-महाविकास आघाडी, एमआयएम व इतर छोट्या-मोठ्या पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यात महायुती असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही तीनही पक्ष एकत्रित लढणार असल्याचे राज्य पातळीवरील नेत्यांकडून सांगितले जात आहे. स्थानिक पातळीवर मात्र स्वबळाची भाषा सुरू आहे. स्वबळाची खुमखुमी असली तरी नेत्यांचा आदेश पाळणार, असे सध्याचे चित्र आहे.
कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळख असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मोकळा झाला आहे. (Municipal Corporation) मंगळवारी दुपारी आदेश प्राप्त होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यासोबतच नेत्यांच्या स्वबळाच्या भाषा सुरू झाल्या आहेत. 25 वर्षांपेक्षा जास्त काळ महापालिकेत सत्तेत असलेली एकसंध शिवसेना यावेळी भाजपसोबत राहणार नाही. तसेच, शिवसेना (यूबीटी) स्वतंत्र लढण्याच्या मूडमध्ये असल्याने उमेदवारांची खिचडी होण्याची शक्यता आहे.
यंदा प्रथमच प्रभाग पद्धतीने निवडणुका होण्याची शक्यता असून, त्याचा फायदा मोठ्या पक्षांना होणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. महापालिकेची निवडणूक गेल्या पाच वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडली आहे. (Chhatrapati Sambhajinagar) एप्रिल 2020 मध्ये नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर महापालिकेवर राज्य शासनाने प्रशासक नियुक्त केला. त्यानंतर कोरोना संसर्गामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाचा विषय समोर आला. कोरोना संसर्ग संपला तरी ओबीसी आरक्षणाच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. दरम्यानच्या काळात लोकसभा, विधानसभेच्या म्हणजेच नेत्यांच्या निवडणुका झाल्या, पण कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निरूत्साह होता. कार्यकर्त्यांची डोळे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या सुनावणीकडे होते.
दरम्यान मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. यंदाची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी वेगळी राहणार आहे. अनेक वर्षे शिवसेना-भाजप युतीमध्ये निवडणुका झालेल्या आहेत तर विरोधात महाविकास आघाडी होती. पण, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर संपूर्ण समीकरणे बदलली आहेत.
फुटलेल्या शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपसोबत आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष कॉंग्रेससोबतच्या महाविकास आघाडीमध्ये आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजप व शिवसेना (यूबीटी) स्वबळाची भाषा करत आहे. तसेच झाल्यास भाजप, शिंदेसेना, ठाकरे सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट, एमआयएम, मनसे यासोबत बसप, रिपाइं असे छोट्यामोठ्या पक्षांचे व काही जण अपक्ष नशीब आजमावतील, अशी शक्यता आहे.
फुटलेल्या शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपसोबत आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष कॉंग्रेससोबतच्या महाविकास आघाडीमध्ये आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजप व शिवसेना (यूबीटी) स्वबळाची भाषा करत आहे. तसेच झाल्यास भाजप, शिंदेसेना, ठाकरे सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट, एमआयएम, मनसे यासोबत बसप, रिपाइं असे छोट्यामोठ्या पक्षांचे व काही जण अपक्ष नशीब आजमावतील, अशी शक्यता आहे.
दहा वर्षांपूर्वीचे महापालिकेतील बलाबल
शहरातील एकूण वॉर्ड-115
शिवसेना-29
भाजप-23
एमआयएम-25
काँग्रेस-10
राष्ट्रवादी काँग्रेस-3
बसप-5
रिपाइं-1
अपक्ष-19
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.