Ambadas Danve-Eknath Shinde News : 'No caption needed'! एकनाथ शिंदे हतबल, अंबादास दानवेंनी साधला निशाणा

Ambadas Danve's harsh criticism while sharing Eknath Shinde's photo : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शेजारी बसलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाकून नमस्कार केला. या फोटोतील त्यांची हतबलता दर्शवत दानवे यांनी या छायाचित्राला कॅप्शनची गरज नसल्याचे म्हटले आहे.
Ambadas Danve -DCM Eknath Shinde News
Ambadas Danve -DCM Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : दोनशे पार जागा जिंकल्यानंतरही राज्यात महायुतीचे सरकार स्थापन व्हायला आठवडा उलटावा लागला. मुख्यमंत्री कोण होणार? या पेक्षाही अधिक चर्चा रंगली ती काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही? याची. शिंदेंनी अखेरपर्यंत ताणले, पण शेवटी दिल्लीतल्या महाशक्तीपुढे त्यांना झुकावेच लागले.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि यावरून सुरु असलेल्या चर्चांना पुर्णविराम दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यातील एक फोटो शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी आपल्या एस्क अकाऊंटवरून पोस्ट करत एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे.

Ambadas Danve -DCM Eknath Shinde News
Eknath Shinde: 'हे' होणारच होते तरीही शिंदे का अडून बसले?

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शेजारी बसलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाकून नमस्कार केला. या फोटोतील त्यांची हतबलता दर्शवत (Ambadas Danve) दानवे यांनी या छायाचित्राला कॅप्शनची गरज नसल्याचे म्हटले आहे. 'No caption needed'! असे म्हणत अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्लीपुढे झुकावेच लागले, असे यातून सुचवण्याचा प्रयत्न केला.

Ambadas Danve -DCM Eknath Shinde News
Ambadas Danve : महाआघाडीचे नेते शपथविधीला का जाणार नाहीत? : अंबादास दानवेंनी सांगितले कारण...

विधानसभा निवडणुकीपुर्वी पासून अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले होते. अगदी महायुतीच्या जागावाटपात भाजप एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला एका एका जागेसाठी रडवेल, असा दावा अंबादास दानवे यांनी केला होता. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले. तरीही त्यांना सत्तेमध्ये अपेक्षित खाती, वाटा मिळत नसल्याने ते नाराज आहेत.

Ambadas Danve -DCM Eknath Shinde News
ShivSena Politics : शिंदेंच्या आमदाराचा अधिकाऱ्यांना इशारा; म्हणाले, 'आता 'यशोधन'च्या कामाची सवय सोडा'

या नाराजीतूनच त्यांनी उपमुख्यमंत्री पद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता, असं त्यांच्याच पक्षातील आमदार व नेत्यांनी सांगितले होते. मात्र दवाब तंत्राचा भाजपवर काहीच परिणाम होत नसल्याचे स्पष्ट होताच शेवटच्या क्षणी का होईना, मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास राजी झाले. आता महसुल, गृह, अर्थ खाते शिवसेनेला मिळणार अशा चर्चा सुरू आहेत.

Ambadas Danve -DCM Eknath Shinde News
Mahayuti Government : सत्तेत परतताच फडणवीसांनी आपल्या 'या' खास अधिकाऱ्याकडे दिली सर्वात मोठी जबाबदारी

त्या किती खऱ्या, किती खोट्या हे मंत्रीमंडळाचा शपथविधी होऊन खाते वाटप केले जाईल तेव्हाच स्पष्ट होईल. तुर्तास महायुतीत अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाची अवस्था वाईट झाल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी फोटो ट्विट करत एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा डिवचले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com