Shivsena News : विधानसभेला बंडखोरी करणाऱ्या बड्या नेत्याची जिल्हा प्रमुख पदावर पुन्हा घरवापसी!

Ramesh Pawar Shiv Sena News: भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्याविरोधात अपक्ष लढत त्यांनी युती धर्म झुगारला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने रमेश पवार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

Eknath Shinde Nashik Municipal Corporation
Eknath Shinde Nashik Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती असताना फुलंब्री मतदारसंघातून बंडखोरी करणारे शिवसेनेचे रमेश पवार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे असलेलेले तीन विधानसभा मतदारसंघातील जिल्हा प्रमुख पदही काढून घेण्यात आले होते. आता रमेश पवार यांची पुन्हा सन्मानाने शिवसेनेत घरवापसी झाली असून त्यांना जिल्हा प्रमुख पदही बहाल करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय शिवसेनेसाठी किती फायद्याचा ठरतो? हे पहावे लागेल. खासदार संदीपान भुमरे (Sandipan bhumare) यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या रमेश पवार यांनी विधानसभा निवडणुकीत बंडाचा झेंडा फडकवला होता. भाजपच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्याविरोधात अपक्ष लढत त्यांनी युती धर्म झुगारला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने रमेश पवार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.


Eknath Shinde Nashik Municipal Corporation
BJP Malegaon : बलाढ्य भाजपला मालेगावात फक्त दोनच जागा जिंकता आल्या, कोणी केली गद्दारी?

शिवसेनेचे (Shivsena) सचिव संजय मोरे यांनी रमेश पवार यांची जिल्हा प्रमुख म्हणून पुन्हा नियुक्ती केली. फुलंब्री, सिल्लोड आणि पैठण या मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तीन विधानसभेचे प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून पुढील एक वर्षासाठी त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.


Eknath Shinde Nashik Municipal Corporation
Shivsena Politics : युतीचा फॉर्म्युला जाहीर! शिवसेनेचा वरचष्मा, भाजपच्या वाट्याला फक्त 2 जागा, इच्छुकांमध्ये असंतोष

दरम्यान, नगरपालिका निवडणुकीपूर्वी आमदार विलास भुमरे यांच्याकडे या तीन विधानसभा मतदारसंघाची प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. आता त्या जागेवर रमेश पवार यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार संदीपान भुमरे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. भुमरे यांच्या कार्यालयात पवार यांचा सत्कारही पार पडला.


Eknath Shinde Nashik Municipal Corporation
NCP Unity Talks : महापालिका निवडणुकीत 'पानिपत', आता जिल्हा परिषदेला दोन्ही राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com