

Fullumbr City Council News : शिवसेनेचे नेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. ते पुन्हा आमदार होणार हे निश्चित झाले असताना इकडे त्यांच्या जिल्ह्यातच पक्षात मोठी फूट पडली. फुलंब्री नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे हे आपल्या सात नगरसेवकांसह लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल होणार आहेत.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेतील रिक्त झालेली आपली जागा काँग्रेसशी झगडून अंबादास दानवे यांच्यासाठी सोडवून घेतली. काल काँग्रेसच्या माघारीसाठी दिवसभर नेत्यांची मनधरणीही केली. अखेर उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश आले आणि विधान परिषदेतील सर्व नऊ जागांची निवड बिनविरोध झाली.
अंबादास दानवे आमदार झाल्याचा आनंद त्यांच्या समर्थकांमध्ये सुरू असतानाच संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा दणका दिला आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या फुलंब्री तालुक्याची नगरपंचायत महाविकास आघाडीच्या म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ताब्यात आली होती. सात नगरसेवक व नगराध्यक्ष पदावर राजेंद्र ठोंबरे हे निवडून आल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता.
मात्र फुलंब्री नगरपंचायतीत सत्ता येऊन सहा महिने होत नाही तोच महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा दणका नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे व सात नगरसेवकांच्या पक्ष सोडून जाण्याने बसला. नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी सात नगरसेवकांसह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
विकासासाठी निधी मिळविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. ड्रेनेज, घरकुल, नदी खोलीकरणासाठी सुमारे १०० कोटींच्या निधीचे आश्वासन मिळाल्याचा दावा त्यांनी केला. या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसणार असून, स्थानिक सत्ता समीकरणे बदलणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.