Ahilyanagar Estimate Committee : अहिल्यानगरात तीन दिवस आमदारांची अंदाज समिती; जलजीवन मिशनचा आढावा, खर्चिक व्यवस्थेचीही चर्चा

Legislative committee Ahilyanagar visit sparks debate over official hospitality and Jal Jeevan Mission review : 27 सदस्यीय समिती अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली; विविध शासकीय विभागांकडून दौऱ्याची व्यापक तयारी
Ahilyanagar Estimate Committee
Ahilyanagar Estimate CommitteeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Estimate Committee : अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाची 27 सदस्यीय अंदाज समिती उद्यापासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहे.

आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या दौऱ्यात जिल्ह्यातील विविध विकासकामांची आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी केली जाणार आहे. मात्र, दौरा सुरू होण्यापूर्वीच समितीच्या सदस्यांसाठी करण्यात येणाऱ्या शाही व्यवस्थेची आणि त्यावरील खर्चाची चर्चा सुरू झाली आहे.

याच अधिवेशनात जलजीवन मिशनच्या कामांतील कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर दहा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यामुळे समिती जलजीवन मिशनच्या कामांची पाहणी करताना कोणती निरीक्षणे नोंदवते आणि अंतिम अहवालात कोणत्या शिफारसी करते, याकडे अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राज्याच्या (Maharashtra) विविध भागांतून येणाऱ्या समिती सदस्यांच्या प्रवासासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या स्थानिक प्रवास, वाहनांचे इंधन, चहा-नाश्ता, भोजन आणि इतर व्यवस्थेचा खर्च विविध शासकीय विभागांवर पडणार असल्याची प्रशासनात चर्चा आहे.

Ahilyanagar Estimate Committee
Ladaki Bahin Update : 'लाडकी'ला हफ्ता कधी मिळणार?, महाजनांनी सांगून टाकलं

समितीत 27 आमदारांचा समावेश असल्याने पुढील तीन दिवस त्यांच्या दौऱ्याची जबाबदारी वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागण्यात आल्याची माहिती आहे. प्रत्येक सदस्याच्या दौऱ्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी स्वतंत्र समन्वय यंत्रणा उभारण्यात आली आहे.

Ahilyanagar Estimate Committee
Sangram Jagtap On Congress : 'गुंगी गुडिया' वादात नवा ट्विस्ट; संग्राम जगताप म्हणाले, 'सुनेत्रा पवारांचे काम दुर्गेच्या रूपात दिसेल'

समिती सदस्य आणि त्यांच्या सचिवांच्या निवासासाठी शहरातील विविध हॉटेल्समध्ये व्यवस्था करण्यात आल्याचे समजते. त्यांच्या ताफ्यातील अन्य कर्मचाऱ्यांची व्यवस्थाही प्रशासनालाच करावी लागत असल्याने संबंधित विभागांवर अतिरिक्त ताण आल्याची चर्चा आहे.

प्रशासनासमोर व्यवस्था करण्याचे आव्हान

दरम्यान, कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नव्या व्हीव्हीआयपी शासकीय विश्रामगृहात मर्यादित खोल्या उपलब्ध असल्याने सर्व सदस्यांची तेथे व्यवस्था करणे शक्य नसल्याचे प्रशासनातील सूत्रांचे म्हणणे आहे. पालकमंत्री आणि सभापतींसाठी राखीव खोल्यांव्यतिरिक्त केवळ काहीच खोल्या उपलब्ध असल्याने निवास व्यवस्थेचे नियोजन प्रशासनासमोर आव्हान ठरले आहे.

भत्ता असूनही पाहुणचाराचा भार?

अंदाज समितीच्या सदस्यांना शासनाकडून दौऱ्यासाठी विशेष भत्ता दिला जातो. मात्र प्रत्यक्ष दौऱ्यादरम्यान निवास, भोजन आणि इतर सोयींची जबाबदारी स्थानिक प्रशासनावरच येते, अशी प्रशासनातील चर्चा आहे. त्यामुळे विविध शासकीय विभागांना स्वतंत्रपणे सदस्यांच्या व्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगितले जाते.

समितीत कोणाचा समावेश?

या समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर असून सदस्य म्हणून सुधीर मुनगंटीवार, चैनसुख संचेती, काशीराम पावरा, कृष्णा खोपडे, प्रशांत ठाकूर, बबनराव लोणीकर, दिलीप बोरसे, मंदा म्हात्रे, मनीषा चौधरी, प्रवीण दटके, नमिता मुंदडा, बालाजी कल्याणकर, किशोर पाटील, किरण सामंत, दिलीपराव बनकर, शेखर निकम, सरोज आहिरे, डॉ. राहुल पाटील, कैलास पाटील, नाना पटोले, रोहित पाटील, श्रीकांत भारतीय, सदाभाऊ खोत, हेमंत पाटील, सतीश चव्हाण आणि सुनील शिंदे यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com