MLA Parvain Swami Meet Minster Sarnaik : शिंदेंच्या मंत्र्याचा उद्धव ठाकरेंच्या आमदाराकडे पाहुणचार! सरनाईक- स्वामी भेटीने खळबळ

Guardian Minister of Dharashiv, Pratap Sarnaik, extends hospitality to an MLA from Uddhav Thackeray’s faction. : निवडणूकीत जय, पराजय होत असतो. पण विद्यमान आमदार स्वामी, माजी आमदार चौगुले एकत्रित काम करत आहेत, याचे मानसिक समाधान वाटते. कटुता निवडणूकीपुरती असावी.
MLA Pravin Swami Meet Guardian Minister Pratap Sarnaik News
MLA Pravin Swami Meet Guardian Minister Pratap Sarnaik NewsSarkarnama
Published on
Updated on

अविनाश काळे

Shivsena News : एकीकडे राज्यात शिवसेना एकत्रि‍करणाच्या चर्चा झडू लागल्या आहेत. तर दुसरीकडे शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील मंत्री, आमदारांमध्येही जवळीक वाढू लागली आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशीव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकताच उमरग्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या घरी भेट त्यांचा पाहुणचार घेतला. या भेटीने जिल्ह्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

अडीच तीन-वर्षापुर्वी राज्यात शिवसेना पक्षात मोठी फुट पडली होती. तेव्हापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर गद्दार, पन्नास खोके, मिंधे गँग अशी टीका केली जाते. परंतु आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन ठाकरे बंधु एकत्रित येण्याची शक्यता मावळू लागली असतानाच आता दोन्ही शिवसेना एकत्रि‍करणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (Shivsena) शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एका मुलाखतीत दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, अशी इच्छा व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर धाराशीव जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा पाहुणचारही घेतला. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावणार हे लक्षात आल्यानंतर सरनाईक (Pratap Sarnaik) आणि स्वामी या दोघांकडूनही या भेटीचे वेगळे अर्थ काढू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. या भेटीच्या वेळी माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची उपस्थिती होती.

MLA Pravin Swami Meet Guardian Minister Pratap Sarnaik News
Pravin Swami B.Ed exam : अभिनंदन! ठाकरेंच्या शिलेदाराला परीक्षेत पडले 77.54% गुण...

उमरगा मतदारसंघाचे तीन टर्म आमदार असलेले ज्ञानराज चौगुले यांचा प्राथमिक शिक्षक असलेले अन् ऐनवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी मिळालेले प्रविण स्वामी यांनी पराभव केला. या पराभवाच्या मागे स्वामी निमित्त मात्र होते, मतदारांचा कौल अन् प्रस्थापितांनी केलेले नियोजन याला कारणीभूत होते, असे बोलले जाते. निवडणूक झाल्यानंतर या दोन्ही आजी-माजी आमदारांमध्ये मतदारसंघातील विकास कामाच्या मुद्यावरून अनेकदा श्रेयवादाची लढाई झाली.

MLA Pravin Swami Meet Guardian Minister Pratap Sarnaik News
Pratap Sarnaik News : मराठा आंदोलकांचा प्रताप सरनाईक यांना घेराव! पुरावे असताना कुणबी प्रमाणपत्रासाठी अडवणुकीचा आरोप

नवीन बसेस कुणी आणल्या यावरून श्रेयवाद सुरू असताना शनिवारी उमरगा बसस्थानकाच्या भूमिपुजन कार्यक्रमात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी माजी आमदार चौगुले यांच्या कामाचे तोंडभरून कौतूक केले. बसस्थानकाची मागणी चौंगुले यांचीच होती हे सांगायला ते विसरले नाहीत. चौगुले उपनेते आहेत, त्यांचे ऐकावे लागते, असे सरनाईक म्हणाले. चौगुले यांचे राजकिय गुरु प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या समोर त्यांनी हे कौतुक केले हे विशेष.

MLA Pravin Swami Meet Guardian Minister Pratap Sarnaik News
Dharashiv News: 'कुणी कितीही ताकद दाखवली,तरी सगळ्यांचा बाप...'; राणेंनी सरनाईकांच्या धाराशिवमध्ये जाऊन शिवसेनेला भरला दम

निवडणूकीत जय, पराजय होत असतो. पण विद्यमान आमदार स्वामी, माजी आमदार चौगुले एकत्रित काम करत आहेत, याचे मानसिक समाधान वाटते. कटुता निवडणूकीपुरती असावी, असे सांगत त्यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्नही केला. दरम्यान, लोकप्रतिनिधी म्हणुन पालकमंत्री यांचा पाहुणचार केला. मतदारसंघातील लोकांनी मोठ्या विश्वासाने मला निवडून दिले. त्यामुळे या भेटीचा कुणी चुकीचा अर्थ काढू नये, मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, असे स्वामी यांनी स्पष्ट केले.

MLA Pravin Swami Meet Guardian Minister Pratap Sarnaik News
Shivsena Politic's : उद्धव ठाकरे अन्‌ एकनाथ शिंदेंच्या एकत्र येण्याबाबत शिवसेना मंत्र्याचे मोठे विधान; म्हणाले ‘ते दोघेही मिठ्या मारतील...’

खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महाआघाडीतील नेते, कार्यकर्त्याचे माझ्या विजयात सहकार् आहे. एक शिक्षक ते आमदार हा बहुमान मोठा आहे. त्यामुळे पालकमंत्री घरी आल्याने सुरू झालेल्या माझ्या पक्षांतराच्या चर्चा निरर्थक आहेत. मतदारसंघातील विकास कामाच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्याचा मंत्री व पालकमंत्री म्हणुन पाहुणचार केला. याचा अर्थ त्यांच्या पक्षात जाण्याचे संकेत असा होत नाही, असेही आमदार स्वामी यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com