Arjun Khotkar : 'बीडची जागा शिवसेनेलाच'; खोतकरांनी दिला जगतापांसह शिवसैनिकांना विश्‍वास!

Beed Vidhan sabaha Election : आगामी आठवड्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्याच्या तयारीच्या निमित्ताने आढावा घेण्यासाठी शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर जिल्ह्यात आले.
Arjun Khotkar
Arjun KhotkarSarakarnama
Published on
Updated on

Shivsena on Beed Constituency : महायुतीत बीडच्या जागेवरुन रस्सीखेच सुरु आहे. महायुतीत शिवसेनेची जागा असलेल्या बीड विधानसभा मतदार संघात उमेदवारीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच स्पर्धा सुरु आहे. मात्र, बीड मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि सध्या सर्वात जास्त अनुकूल परिस्थिती असल्याने बीडची जागा शिवसेनेलाच सुटणार यात शंका नाही, अशी ग्वाही शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांनी दिली. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला

महाराष्ट्रातील शिवसेना(Shivsena) जिल्हा प्रमुखांपैकी बीडचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप मुख्यमंत्री शिंदे यांचे जवळचे आणि विश्वासू आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीवर एकनाथ शिंदेंचा विश्‍वास असल्याने बीडची जागा शिवसेनेलाच सुटणार असल्याचे अर्जुन खोतकर म्हणाले.

Arjun Khotkar
Rajesh Tope News : जरांगेंच्या बालेकिल्ल्यात इच्छुकांची गर्दी; टोपेंनी दिली सविस्तर माहिती, म्हणाले...

दरम्यान, महायुतीमध्ये जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ भाजपला(BJP) तर बीडचा मतदार संघ शिवसेनेकडे असे. महायुतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सहभाग झाला. त्यानंतर ज्यांचा आमदार त्या पक्षाला जागा असे समीकरण मांडायला राष्ट्रवादीने सुरुवात केली. वास्तविक बीडचे आमदार संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी वरील समिकरणाने शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करतानाच पक्षातही अर्धा डझन इच्छुकांच्या कोपराला उमेदवारीचा गुळ लावला आहे.

Arjun Khotkar
Ramdas Athawale : मनोज जरांगेंची मागणी योग्यच, लवकर तोडगा काढा; आठवलेंचा महायुती सरकारला सल्ला

दरम्यान, पुढील आठवड्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्याच्या तयारीच्या निमित्ताने आढावा घेण्यासाठी शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर(Arjun Khotkar ) जिल्ह्यात आले. त्यांनी बीडची जागा शिवसेनेलाच असेल असा विश्‍वास व्यक्त केला. बीडमधून जिल्हाप्रमुख अनिल जगताप तयारी करत आहेत. येणारा काळ शिवसेनेचा आणि शिवसैनिकांच्या भगव्याचा असून महाराष्ट्रावर भगवा फडकविण्यासाठी एकजूट होऊन ताकदीने विधानसभा निवडणूक लढवायची असल्याचे सांगितले. यावेळी अनिल जगताप, सचिन मुळूक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com