Shiv Sena controversy : शिंदेच्या खाजगी सचिवांविरोधातच महिला पदाधिकाऱ्याची पोलिसांत धाव; शिवसेनेच्या कार्यक्रमात पती-पत्नीला मारहाण केल्याचा आरोप

Eknath Shinde, Balaji Patil Khatgaonkar, Shiv Sena, Nanded news : उपमुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवांवरच अशा प्रकारचे गंभीर आरोप झाल्याने या तक्रारीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Eknath Shinde, Balaji Patil Khatgaonkar
Eknath Shinde, Balaji Patil KhatgaonkarSarkarnama
Published on: 
Updated on: 

संजय सूर्यवंशी

Eknath Shinde private secretary news : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांच्या विरोधात शिवसेनेच्याच महिला पदाधिकाऱ्याने गंभीर आरोप केले आहेत. आपल्यासह पतीला मारहाण केली, शिवीगाळ केल्याची तक्रार या महिला पदाधिकाऱ्याने पोलिसांत केली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शिवसेना महिला तालुका प्रमुख मिराबाई गंगाधर तमलूरकर यांनी ही तक्रार दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील खानापूर येथील लक्ष्मी लॉन्स मंगल कार्यालयात ७ नोव्हेंबरला शिवसेनेच्या वतीने गरीब नागरिकांसाठी शिधावाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खतगावकर तसेच तमलूरकर याही उपस्थित होत्या.

मिराबाई तमलूरकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांनी जातीचा उल्लेख करून शिवीगाळ केली, तसेच केस ओढून मारहाण केली. एवढेच नाही तर आपले पती बचावासाठी पुढे आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.

Eknath Shinde, Balaji Patil Khatgaonkar
Monika Thakur transfer : वरिष्ठ महिला अधिकाऱ्याची नागपूरला झालेली बदली सहा दिवसांतच रद्द; पदभार स्वीकारल्यानंतर सरकारने दिला झटका

व्यंकट पाटील खतगावकर, उमेश मुंडे आणि डॉ. व्यंकट धुमाळे यांनीही जातिवाचक शिवीगाळ करून अपमानित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेवेळी उमाकांत पाटील, सायलू गायकवाड, राजेंद्र गोपड आणि साहेबराव नटकर यांनी मध्यस्थी करून आपली सुटका केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.

Eknath Shinde, Balaji Patil Khatgaonkar
Rahul Gandhi Phone Tapping : फोनमध्ये सर्व पुरावे, पंतप्रधानांकडून टॅप केला जातोय! राहुल गांधींचा गंभीर आरोप

उपमुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवांवरच अशा प्रकारचे गंभीर आरोप झाल्याने या तक्रारीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मिराबाई तमलूरकर यांनी देगलूर पोलिसांकडे केली आहे. आता या तक्रारीवर पोलीस काय कार्यवाही करणार, याकडे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.