Sambhajinagar Mahapalika : संभाजीनगरमध्ये भाजपच्या नेत्यांनी प्रतिष्ठेचा विषय केला अन् युती तुटली; CM फडणवीसांची पहिल्यांदाच कबुली

Sambhajinagar Shiv Sena BJP Alliance : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेना-भाजप युती तुटण्यामागे स्थानिक नेत्यांची भुमिका, जागावाटप वाद आणि अंतिम प्रस्ताव नाकारल्याची बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली.
Devendra Fadnavis addressing media while explaining the reasons behind the Shiv Sena–BJP alliance breakdown in the Chhatrapati Sambhajinagar municipal elections.
Devendra Fadnavis addressing media while explaining the reasons behind the Shiv Sena–BJP alliance breakdown in the Chhatrapati Sambhajinagar municipal elections.Sarkarnama
Published on
Updated on

Sambhajinagar shivsena BJP News : राज्याच्या सत्तेत असलेल्या महायुतीतील शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची युती महापालिकेत बहुतांश ठिकाणी तुटली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा सुरू असताना युती तुटली आणि आता दोन्ही पक्ष स्वबळावर लढत आहेत. युती कोणामुळे तुटली? यावरून आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरूच आहेत. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाची बाब समोर आणली आहे.

संभाजीनगरमध्ये शिवसेना-भाजप युती व्हावी, अशी माझीही इच्छा होती. पण आमच्या स्थानिक नेत्यांनीही प्रतिष्ठेचा विषय केला आणि अंतिम प्रस्ताव पाठवला. पण तो शिवसेनेने नाकारला आणि युती तुटली, असे फडणवीस म्हणाले. खरतर काही जागा सोडाव्या लागल्या तरी काही हरकत नाही. सगळेच उमेदवार निवडून येतात, असे नाही. पण मग आमच्या स्थानिक नेत्यांनीही काही जागांबद्दल प्रश्न उपस्थितीत केला. ते आमच्या सिटिंग जागा मागत आहेत, त्या कशा द्यायच्या? असं त्यांचं म्हणणं होतं.

शेवटी आम्हाला स्थानिक नेत्यांचेही ऐकून घ्यावे लागते. मग आमच्याकडून शिवसेनेला अंतिम प्रस्ताव पाठवला गेला. पण त्यांनी तो मान्य केला नाही आणि संभाजीनगरमध्ये युती तुटली, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेप्रमाणेच छत्रपती संभाजीनगर महापालिका महायुतीसाठी महत्वाची आहे. राज्यातील 29 पैकी काही ठिकाणीच शिवसेना-भाजप युती होऊ शकली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी युतीतील हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत.

Devendra Fadnavis addressing media while explaining the reasons behind the Shiv Sena–BJP alliance breakdown in the Chhatrapati Sambhajinagar municipal elections.
Chhatrapati Sambhajinagar News : 'पक्ष वेगळे, पण चेहरे तेच'; भाजप-शिवसेनेच्या यादीत माजी नगरसेवकांचाच बोलबाला; बंडखोरांचे टेन्शन वाढणार?

शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांचा अंहकार आणि हट्टापायी त्यांनी युती तोडल्याचा आरोप केला. तर भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी संजय शिरसाट यांनी आपल्या मुला-मुलीच्या तिकीटासाठी युती तोडल्याचा हल्लाबोल केला होता. मुख्यमंत्र्यांनी सांगूनही भाजपच्या नेत्यांनी युती तोडली आता, भोगा, असा टोला काल संजय शिरसाट यांनी लगावला होता. त्यानंतर आज मुंबईत मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शिवसेना-भाजपच्या तुटलेल्या युतीवर भाष्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com