CJP news : प्रियांका चतुर्वेदींनी खंत बोलून दाखविली; कॉक्रोच जनता पार्टीने लगेचच घेतली दखल, अभिजीत दीपके सरसावले

Cockroach Janata Party, Priyanka Chaturvedi statement : प्रियांका चतुर्वेदी यांच्याप्रमाणे इतर काहींनीही सोशल मीडियात याबाबत मते व्यक्त केली आहेत.
Priyanka Chaturvedi
Priyanka Chaturvedi Sarkarnama
Published on
Updated on

Abhijeet Dipke news : कॉक्रोच जनता पार्टीकडून ६ जूनला दिल्लीत पहिले आंदोलन केले जाणार आहे. या माध्यमातून केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी पार्टीच्या तीन प्रवक्त्यांनी बुधवारी पहिली पत्रकार परिषद घेतली.

पार्टीने सौरव दास यांना मुख्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी दिली आहे. तर आशुतोष रांका आणि विजेता दहिया हे प्रवक्ते असतील. तिघेही सोशल मीडियात सक्रीय असून त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. या तिघांच्या नियुक्तीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी एक खंत बोलून दाखविली.

चतुर्वेदी यांनी याअनुषंगाने सोशल मीडियात एक पोस्ट करत म्हटले आहे की, कॉक्रोच जनता पार्टीची सुरूवात १०० टक्के पुरूष प्रतिनिधित्वाने होत आहे. संस्थापक, सह-संस्थापक आणि प्रवक्ते, सगळेच पुरूष आहेत. आता पुढे काय घडतंय, याची उत्सुकता आहे.

Priyanka Chaturvedi
MLA verdict : कोर्टाचा अभूतपूर्व निकाल, 10 वर्षांनंतर आमदारकी रद्द; पराभूत उमेदवाराला केलं विजयी घोषित

चतुर्वेदी यांच्याप्रमाणे इतर काहींनीही सोशल मीडियात याबाबत मते व्यक्त केली आहेत. त्यानंतर पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या मुद्द्यावरून स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही टीममधील अनेक महिला सदस्यांना याबाबत विचारणा केली होती, पण त्यांनीच नकार दिल्याचे दीपके यांनी सांगितले.

दीपके यांनी सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटले आहे की, टीममधील महिला सदस्यांना ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी त्यांच्यावर होणारी ऑनलाईन टीका, धमक्यांमुळे पुढे येऊन काम करण्यास असमर्थता दर्शविली. आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करतो.

Priyanka Chaturvedi
DK Shivakumar CM : शिवकुमार यांनी शपथ घेत असतानाच राहुल गांधींना केलं खूश; सिध्दरामय्यांनाही मिळालं दुसरं मोठं गिफ्ट

दीपके यांनी तरूण महिलांनाही प्रवक्त्या म्हणून पुढे येण्याचे आवाहन केले. चळवळीचा भाग बनू इच्छिणाऱ्या आणि प्रवक्त्या म्हणून पुढे येण्याची तयारी असलेल्या तरुण महिलांनी सहभागी व्हावे, असे दीपके यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com