Ambadas Danve: "माय मरो पण मावशी जगो"; हिंदी भाषेचा गौरव करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांना शिवसेनेचा टोला

Ambadas Danve Criticizes Devendra Fadnavis : मुंबईतील एका कार्यक्रमात अमित शहा यांच्यासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेचा गौरव केला होता.
Ambadas Danve and Devendra Fadnavis
Ambadas Danve and Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Ambadas Danve Criticizes Devendra Fadnavis : "माझी आई मराठी आहे, मात्र देशातील इतर सर्व भाषा माझ्या मावशीसारख्या आहेत. आईचा गौरव करतानाच मावशीचाही पूर्ण सन्मान राखला पाहिजे," अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीसह इतर सर्व भाषांचा आदर केला. परंतू त्यांच्या या विधानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने टीका केली आहे.

ठाकरेंचे विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हटलं की, "मराठीत एक म्हण आहे. माय मरो पण मावशी जगो" असं मुख्यमंत्र्यांना म्हणायचं आहे का?" याचा अर्थ मराठी मेली तरी चालेल पण हिंदी जगली पाहिजे, अशा आशयानं दानवेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हिंदी दिवस आणि सहावे अखिल राजभाषा संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनातील भाषणात फडणवीस यांनी वरील विधान केले.

Ambadas Danve and Devendra Fadnavis
Explainer: 2029च्या लोकसभेसाठी 'समान नागरी कायदा' प्रचाराचा मुख्य मुद्दा! पण सरकार एकदाच संसदेत का करत नाहीए कायदा?

मातृभाषा शिकलीच पाहिजे, याचा समावेश नव्या शिक्षण धोरणातही केला गेला आहे. मातृभाषेसोबतच इतर एक भाषा शिकण्याचा समावेश त्यात आहे. मराठी ही माझी आई आहे आणि देशातील इतर भाषा मावशी सारख्या आहेत. आईचा गौरव करताना मावशांचाही सन्मान राखला पाहिजे, मातृभाषा शिकलीच पाहिजे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी दिवस आणि हिंदी संमेलनात आपली भूमिका मांडली होती. त्याचबरोबर हिंदी, मराठीप्रमाणे इतर भाषांचाही परस्पर आदर राखण्याचा सर्वांनी संकल्प केला पाहिजे, असं आवाहनही फडणवीसांनी यावेळी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com