Maharashtra SIR News: मोठी बातमी: ...म्हणून 'एसआयआर' प्रक्रियेला 29 नोव्हेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ मिळावी; औरंगाबाद खंडपीठात याचिका

Mumbai High Court Aurangabad Bench: सध्या राज्यात सुरू असलेला पावसाळा व प्रतिकूल हवामान, शेतकरी, शेतमजूर वर्ग कृषी कामांमध्ये व्यस्त असल्याने पडताळणीच्या वेळी घरी ते उपलब्ध नसणे, रोजंदारी कामगार, स्थलांतरित कामगार, नोकरदार, विद्यार्थी व इतर नागरिक रोजगार, शिक्षण परीक्षा आणि इतर कारणांमुळे तात्पुरते वास्तव्यास नसणे.
Maharashtra SIR
Maharashtra SIR Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेला 29 नोव्हेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ मिळावी अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आली आहे.

याचिकाकर्ते इकबाल पटेल यांनी याचिकेत म्हणणे मांडले आहे, की निवडणूक आयोगाने विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण ( एसआयआर) प्रक्रियेची अंतिम मुदत 8 ऑगस्ट 2026 ठेवली आहे. कुणीही पात्र मतदार वंचित राहू नये आणि कोणताही अपात्र व्यक्ती मतदार यादीत समाविष्ट होऊ नये या उद्देशाने तीन महिन्यांच्या मुदतवाढीसाठी ही याचिका सादर करण्यात आली आहे.

सध्या राज्यात सुरू असलेला पावसाळा व प्रतिकूल हवामान, शेतकरी, शेतमजूर वर्ग कृषी कामांमध्ये व्यस्त असल्याने पडताळणीच्या वेळी घरी ते उपलब्ध नसणे, रोजंदारी कामगार, स्थलांतरित कामगार, नोकरदार, विद्यार्थी व इतर नागरिक रोजगार, शिक्षण परीक्षा आणि इतर कारणांमुळे तात्पुरते वास्तव्यास नसणे.

तसेच दुर्गम व ग्रामीण भागात घरोघरी पडताळणी प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी अधिक वेळेची आवश्यकता आहे. कोणताही पात्र मतदार केवळ अनुपस्थितीमुळे मतदार यादीतून वगळला जाऊ नये, तसेच कोणताही अपात्र व्यक्ती मतदार यादीत समाविष्ट होऊ नये, हा उद्देश याचिका सादर करण्यामागे असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

Maharashtra SIR
Modi Government Scheme: फडणवीसांच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर मोदी सरकारचं शेतकर्‍यांना मोठं गिफ्ट; पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

याचिकेत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती किंवा अडथळा निर्माण करण्याची कोणतीही मागणी करण्यात आलेली नसून, केवळ विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रिया प्रभावी, सर्वसमावेशक आणि न्याय्य पद्धतीने राबविण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. एकलव्य संदेश पोतदार काम पाहत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com