Balasaheb Ajbe advice to farmers : ...तर अधिकाऱ्यांना चपलेने मारा, बाकीचं मी बघतो; बाळासाहेब आजबेंचा शेतकऱ्यांना सल्ला

Ashti News: विहिरीच्या आणि घरांच्या कामासाठी तसेच शासनाकडून मिळणाऱ्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचा आरोप केला आहे.
Balasaheb Ajbe advice to farmers :
Balasaheb Ajbe advice to farmers :Facebook @Balasaheb Ajabe
Published on: 
Updated on: 

Beed News: शिंदे गटातील आमदारांकडून अधिकाऱ्यांना मारहाण होत असल्याचे अनेक व्हिडीओ 'अधिकारी पैसे घेत असेल तर चपले ने मारा.. बघू काय होत ते,' असा सल्ला बीडच्या आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिला आहे. आजबे हे अजित पवार गटाचे सत्तेतील आमदार आहेत.

15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर आष्टी तहसील कार्यालय सर्व विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला सर्व विभागाचे विभाग प्रमुख तसेच नागरिक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. आष्टी मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी शेतकऱ्यांकडून लाच मागत आहेत. कामासाठी तसेच शासनाकडून येणाऱ्या सर्व योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. विहिरीच्या आणि घरांच्या कामासाठी तसेच शासनाकडून मिळणाऱ्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचा आरोप केला आहे. (Beed News)

Balasaheb Ajbe advice to farmers :
MU Senate Election : सिनेट निवडणुकांच्या स्थगितीवरून राजकारण तापणार; ठाकरे गट-मनसे-विद्यार्थी संघटना आक्रमक

किरकोळ व लहान लहान गोष्टीसाठी सुद्धा पैसे मागितले जात आहे. त्याचबरोबर तुमचं काम करायचं असेल तर याला बोला त्याला बोला व याची शिफारस आणि त्याची शिफारस आणा अशा तक्रारी येत आहेत. हे आता इथून पुढे चालणार नाही आणि असं कोणी करत असेल तर त्याला तिथेच चपलाने मारा बाकी मी पाहतो…

सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काच्या विहिरी आणि घरे मिळवण्यासाठी जर पैसे द्यावे लागत असतील तर यासारखं मोठं दुर्दैव दुसरं नाही. तुमच्या हक्काचं काम करताना कोणतीही पैसे मागत असतली तर तर देऊ नका, अन कोणता अधिकारी कर्मचारी पैसे मागत असतील तर अशांना चपलेने मारा, बाकीचं मी पाहतो, असं बाळासाहेब आजबे यांनी म्हटलं आहे.

Balasaheb Ajbe advice to farmers :
MU Senate Election : 'राजाबाई टाॅवर' मंत्रालयासमोर झुकलेच; 'सिनेट'वरून ठाकरे गटाची शेलक्या शब्दात टीका !

मला तुमच्या अन्नात मला माती कालवायची नाही, पण जनतेची कामे रखडली आणि जर तुम्ही त्यांना पैसे मागितले तर तुमची गय करणार नाही. अशा शब्दात आमदार आजबेंनी अधिकाऱ्यांनाही इशाराच दिला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.