MU Senate Election : सिनेट निवडणुकांच्या स्थगितीवरून राजकारण तापणार; ठाकरे गट-मनसे-विद्यार्थी संघटना आक्रमक

Mumbai University Senate Election News : "अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दहाच्या दहा जागा निवडून आणू .."
MU Senate Election :
MU Senate Election : Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेल्या सिनेट निवडणुका अचानकपणे स्थगित केल्या आहेत. पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगितीचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे सर्वच पक्षाकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. ९ ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र आता तडकाफडकी या निवडणुका स्थगित केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गट व मनसेकडून सत्तधारी पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. (Latest Marathi News)

MU Senate Election :
MU Senate Election : मोठी बातमी ! मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला अचानक स्थगिती; कारण मात्र गुलदस्त्यात..

मनसेची टीका -

अचानक सिनेट निवडणुकांचा कार्यक्रम रद्द केला याचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध करतो. तीन-तीन पक्ष सत्तेत असताना देखील त्यांना विश्वास नाही. या सरकारने कोणाची धास्ती घेतली आहे, त्यांना विश्वास बसत नाही की, आपण निवडून येऊ तोपर्यंत कोणत्याही निवडणुका लावायच्या नाहीत, असं यांचं ध्येय दिसत आहे. आता निवडणुका स्थगित झाल्या असल्या तरी येत्या काळात निवडणुका लागतील तेव्हा अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दहाच्या दहा जागा निवडून आणू , असा विश्वास मनसे विद्यार्थी सेना अखिल चित्रे यांनी व्यक्त केला आहे. .

ठाकरे गटाची टीका -

अखेर 'राजाबाई टॉवर' मंत्रालयासमोर झुकला', अशा शेलक्या शब्दांत ठाकरे गटाचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सामंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची राळ उडवली. एकदा निवडणूक जाहीर केल्यानंतर तडकाफडकी असे निर्णय घेणे बेकायदेशीर आहे, अगदी विद्यापीठाच्याही निवडणुका नकोत, हे लोकशाहीला प्रचंड घातक असल्याची टीका, ठाकरे गटाच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केली आहे.

MU Senate Election :
MNS vs Shinde Group News : शिंदे गटातील मोठा पदाधिकारी फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो; मनसे आमदार देणार पुरावा !

छात्रभारती विद्यार्थी संघटनेची टीका -

सरकारसोबत असलेल्या पक्षांच्या विद्यार्थी आघाडीची तयारी नाही, त्यामुळे आपला पराभव निश्चित होणार, हे लक्षात आल्यानेच भाजप-शिंदे गटाने हा रडीचा डाव खेळला आहे, असे छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रोहित ढाले म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.