Om Rajenimbalakar : 268 कोटींच्या निधीला स्थगिती अन् ओम राजेनिंबाळकरांचा पाराच चढला; अधिकाऱ्यांना भरला दम

Om Rajenimbalkar controversy News : कोणाच्या सांगण्यावरून माझ्या कामात आडकाठी आणू नका, मला माझ्या जुन्या रूपात आणले तर तुमची अडचण होईल, असा इशाराच खासदार राजेनिंबाळकर यांनी प्रशासनाला दिला.
Omraje Nimbalkar
Omraje NimbalkarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Dharashiv News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या 268 कोटीच्या रुपयांच्या विकास निधीला स्थगिती दिली. या कामाला स्थगिती दिल्याच्या मुद्द्यावरून धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा पारा चांगलाच चढला होता. त्यांनी भर बैठकीतच जिल्हाधिकारी कीर्ती किरण कुमार पुजारी व जिल्हा नियोजन अधिकारी यांना चांगलाच दम भरला. कोणाच्या सांगण्यावरून माझ्या कामात आडकाठी आणू नका, मला माझ्या जुन्या रूपात आणले तर तुमची अडचण होईल, असा इशाराच खासदार राजेनिंबाळकर यांनी प्रशासनाला दिला.

धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या 268 कोटीच्या रुपयांच्या विकास निधीला स्थगिती दिली अन् त्याच कामाला स्थगिती दिल्याच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. तुम्ही जे नियम मला दाखवत आहेत. त्या नियमानुसार तुम्हाला वागावे लागणार आहे. कायद्याच्या एकदम टोकावर जर तुम्ही बोट ठेऊन चालणार असाल तर मी पण तुमच्याप्रमाणे नियमावर बोट ठेवूनच चालेल, असा इशारा देखील यावेळी खासदार राजेनिंबाळकर (Om Rajenimbalkar) यांनी दिला.

Omraje Nimbalkar
BJP News : भाजप शहराध्यक्षपदासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये 4 आमदारांची फिल्डिंग; कोण होणार नवा नायक?

जिल्ह्ह्याची डीपीडीसीची बैठक घेतली. या बैठकीत सर्व जणांनी मिळूनच निधीचे वाटप केले. त्यानंतरच 268 कोटीच्या रुपयांच्या विकास निधीला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर अचानक जर या निधीला स्थगिती दिली जात असेल तर याला काय अर्थ आहे. या गोष्टीमुळे येथील वातावरण खराब होईल. शेवटी तुम्हाला जिल्हयाचा विकास करायचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Omraje Nimbalkar
Dharashiv BJP District President : धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच; कोणाची वर्णी लागणार उत्सुकता शिगेला

या ठिकाणी काही माणसे ज्या मानसिकतेची आहेत, त्या मानसिकतेच्या आम्ही नाहीत. आम्हाला फक्त काम करायचे आहे, असे देखील खासदार निंबाळकर यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

Omraje Nimbalkar
Kolhapur BJP Politics: जुन्याच कार्यकर्त्यांना भाजप जिल्हाध्यक्ष पदाची संधी! माधुरी मिसाळांनी नव्यांना ठणकावले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Ravi rana, Navneet Rana, balvant wankhde
Tukaram Mundhe
Allahabad High Court has stayed Nandlal Rai’s conviction and life sentence while his appeal remains pending, after he expressed a desire to contest the 2027 Uttar Pradesh Assembly election.
Omraje Nimbalakar, ambadas danve