Inspiring Story : जिद्दीला सलाम! वडील दिव्यांग, पदरात दोन मुलं; तरी बीडच्या सुमैयानं पोलिस भरतीत खेचून आणलं यश

Despite having a disabled father and raising two children, Sumaiya Sharif Shaikh from Beed Majalgaon achieves success in Mumbai Railway Police recruitment through sheer determination : बीड माजलगाव इथल्या सुमैया शरीफ शेख हिनं प्रतिकुल परिस्थितीवर मात करत मुंबई लोहमार्ग पोलिस दलाच्या भरतीत यश मिळवलं.
Sumaiya Sharif Shaikh
Sumaiya Sharif ShaikhSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Railway Police recruitment : महिलेला वैज्ञानिक दृष्टीकोन मिळाल्यास, कणखर साथ मिळाल्यास, ती कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकते. यश खेचून आणू शकते. असंच यश बीड जिल्ह्यातील माजलगाव इथल्या दिंद्रुड गावच्या सुमैया शरीफ शेख हिनं खेचून आणलं आहे.

तिची मुंबई लोहमार्ग पोलिस दलात निवड झाली आहे. या निवडीनंतर तिनं यशाचा जल्लोष आपल्या दिव्यांग वडिलांना खांद्यावर घेऊन केला. तसंच आपल्या दोन मुलांबरोबर केला.

बीड (Beed) जिल्हा तसा गुन्हेगारीमुळे राज्यासह देशात गाजत आहेत. पण अशा जिल्ह्यात काही अशा घटना घडत आहे की, त्यामुळे महिलांना प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन मिळत आहे. अशीच प्रेरणा माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड इथल्या सुमैया यांनी महिलांसमोर ठेवली आहे.

दोन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आणि घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही, सुमेया हिनं मुंबई लोहमार्ग पोलिस (Police) दल भरतीत यश खेचून आणलं आहे. सुमेया हिच्या यशाचा जल्लोष तिला मार्गदर्शन करत असलेल्या इंस्पायर अॅकॅडमीत देखील करण्यात आला.

Sumaiya Sharif Shaikh
Sagar Moholkar : मोहोळकराच्या शरीरात अजूनही चार बुलेट्स; गोळीबारानंतरचे 10 दिवस, पैलवानच्या प्रकृतीबाबत धक्कादायक अपडेट

सुमेया हिचा हा प्रवास सोपा नव्हता. पदरात दोन लहान मुले असताना घराची जबाबदारी सांभाळून तिनं अभ्यासासाठी आणि शारीरिक कसरतीसाठी वेळ काढला. गेल्या दोन वर्षांपासून ती अत्यंत कठोर परिश्रम घेत होती. कौटुंबिक अडचणींवर मात करत तिनं पोलिस होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केलं.

Sumaiya Sharif Shaikh
Brick kiln worker son success story : 30 वर्षे वीटभट्टीवर काम… आईवडिलांच्या कष्टांच्या विटांवर उभं राहिलं स्वप्न! ज्ञानेश्वराने स्पर्धा परीक्षेत कोरलं यशाचं सुवर्णपान

गावाला आनंद गगनात मावेना

अखेर तिच्या या चिकाटी, जिद्दीला फळ मिळालं असून ती आता खाकी वर्दीत दिसणार आहे. सुमेया हिच्या यशानंतर दिंद्रुड तिच्या गावात आनंदाचे वातावरण आहे. असं असलं तरी यशानंतर तिच्यासह उपस्थितांचे डोळे आनंदानं पाणावले होते.

दिव्यांग वडिलांची खांद्यावर घेत मिवरणूक

आपल्या यशाचे श्रेय देताना सुमेया हिनं आपले दिव्यांग वडील शरीफ यांना दिलं. त्यांना खांद्यावर उचलून घेत, मिरवणूक काढली. एका पोलिस झालेल्या कन्येने आपल्या दिव्यांग वडिलांप्रती व्यक्त केलेली ही कृतज्ञता बघून संपूर्ण गाव भारावून गेलं होतं.

ग्रामीण भागातील मुलींसमोर आदर्श

आजच्या काळात स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेत अनेक तरुण खचून जातात, अशा वेळी दोन मुलांची आई असतानाही सुमेया हिनं मिळवलेलं हे यश ग्रामीण भागातील मुलींसाठी मोठी प्रेरणा ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com