Suresh Dhas: आमदार सुरेश धस यांची 'वेगळी चूल'; सावरगाव गडाला फाटा देत यंदा मच्छिंद्रनाथ गडावर दसरा मेळाव्याचा बार

Beed Politics News: बीड जिल्ह्यात आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत २० ऑक्टोबरला आष्टी तालुक्यातील मायंबा येथील मच्छिंद्रनाथ गडावर दसरा मेळावा होणार आहे. या आयोजनामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Suresh Dhas
Suresh Dhas sarkarnama
Published on: 
Updated on: 

नितीन चव्हाण

Beed Politics News: बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या काय चाललंय? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. दसरा जवळ आल्याने दरवर्षीप्रमाणे कुणाचा दसरा मेळावा धडाक्यात होणार याच्या चर्चा रंगल्या असतानाच आमदार सुरेश धस यांनी आपला वेगळाच रस्ता निवडल्याचे दिसत आहे. एकीकडे सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याची तयारी जोरात सुरू असतानाच, दुसरीकडे महायुतीचे नेते तथा स्थानिक आमदार सुरेश धस यांनी थेट वेगळी चूल मांडल्याचे समोर आले आहे.

सावरगाव गडाला फाटा देत किंवा पर्यायी केंद्र म्हणून आष्टी तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड, मायंबा येथे यंदाचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सुरेश धस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड, मायंबा हे बीडमधील नाथ संप्रदायातील भाविकांचे श्रद्धास्थान असून, येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून परंपरा जपली जाते. याच परंपरेचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून यंदा २० ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता संत, महंत आणि विश्वस्त आमदार सुरेश धस यांच्या प्रमुख उपस्थितीत दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गडाचे दादासाहेब चितळे यांनी दिली आहे.

Suresh Dhas
Ravindra Dhangekar: भाजप नेत्यांचे रिपोर्ट कार्ड मुख्यमंत्री आता पोलिसांकडून बनवून घेणार? शिंदेंच्या पक्षातील बड्या नेत्याचा खळबळजनक दावा!

नाथ संप्रदायाची समृद्ध परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, भाविकांमधील श्रद्धा आणि भक्तिभाव अधिक दृढ करणे तसेच गडाशी जोडलेल्या सेवक व नाथभक्तांचा सहभाग वाढवणे या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन केले जात असल्याची माहितीही पुढे आली आहे. यंदाच्या या मेळाव्यासाठी गडावर जय्यत तयारी सुरू असून, २० ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० ते ११:४५ या वेळेत श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर उपस्थित राहावे, असे आवाहन गडाचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, उपाध्यक्ष, सचिव आणि समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Suresh Dhas
Eknath Shinde News : 'ते धाडस नसते केले तर...' ; बंडाची आठवण काढत एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

एकाच जिल्ह्यात आणि जवळपास एकाच समयपत्रिकेत दसरा मेळाव्याचे असे वेगळे गट-तट पडल्यासारखे चित्र निर्माण झाल्यामुळे राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्या आहेत. आमदार सुरेश धस यांनी घेतलेला हा वेगळा राजकीय व धार्मिक पवित्रा आगामी काळात बीडच्या राजकारणात कोणते नवे रंग दाखवणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com