Suresh Dhas : मोर्चाआडून पतीला टार्गेट, वैयक्तिक बदनामी करणाऱ्या बाळासाहेब आजबेंविरोधात प्राजक्ता धस मैदानात; अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार!

Balasaheb Ajbe allegations News : दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माजी आमदार बाळासाहेब आजबे, भीमराव धोंडे यांनी जलहक्क जनआक्रोश मोर्चा काढला.
suresh dhas, prajkta dhas
suresh dhas, prajkta dhasSarkarnama
Published on: 
Updated on: 

BJP Politics : बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आष्टी, धारूर, पाटोदा तीन तालुक्यातील दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माजी आमदार बाळासाहेब आजबे, भीमराव धोंडे यांनी जलहक्क जनआक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात धोंडे-आजबे जोडीने भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केले होते. आजबे यांनी तर वादाच्या जमिनी खरेदी करण्याचा सपाटा सुरू आहे, साहेब मॅडमला आवरा, असे म्हणत धस यांच्या पत्नीवर अप्रत्यक्ष टीका केली होती.

धस यांनी मोर्चात लोकांनी येऊ नये यासाठी गावच्या सरपंचाना आणि नागरिकांना फोन केल्याचा आरोप आजबे-धोंडे यांनी केला होता. या आरोपांचे आणि धस यांच्या पत्नीवर केलेल्या टीकेचे पडसाद आता उमटू लागले आहेत. मोर्चाआडून पती आणि आपल्याला टार्गेट करणाऱ्या बाळासाहेब आजबे यांच्याविरोधात धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस या प्रचंड आक्रमक झाल्या आहेत.

बाळासाहेब आजबे (Balasheb Ajabe), आधी जिभेला आवर घाला, भाऊसाहेब आजबेंचे वारस असाल तर आरोप सिद्ध करा, अन्यथा तुमच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, असा इशाराच प्राजक्ता धस यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन केला. दुष्काळाच्या प्रश्नांवर काढलेल्या मोर्चात शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नांऐवजी माझ्या चारित्र्यहननाचा प्रयत्न करणाऱ्या बाळासाहेब आजबे यांनी आधी स्वतःच्या जिभेला आवर घालावा.

suresh dhas, prajkta dhas
Maharashtra Political Live Update : पुणे पोलिसांनी 150 गणेश मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणुकीला परवानगी नाकारली,धंगेकर संतापले

माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करण्याचे धाडस दाखवावे. भाऊसाहेब आजबे यांचे खरेच वारस असाल, तर केवळ आरोप करून पळ काढू नका पुराव्यांसह आरोप सिद्ध करा, अन्यथा न्यायालयात खेचू असा थेट इशाराच महानंदच्या संचालिका प्राजक्ता धस यांनी दिला आहे. बाळासाहेब आजबेंविरोधात न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

suresh dhas, prajkta dhas
Maharashtra Political Live Update : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला उद्धव ठाकरेंसह आमदार खासदार आंदोलन करणार

बालिश बडबडला.. तुमची नैतिकता काय?

माजी आमदार भीमराव धोंडे (Bhimrao Dhonde) आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी काढलेल्या दुष्काळी मोर्चात राजकीय आणि वैयक्तिक चिखलफेक केल्याचा आरोप धस यांनी केला. 'मॅडमला आवरा' या वक्तव्यावर पाच टर्म आमदार राहिलेल्या माझ्या पतींचा मला नैतिक धाक आहे, त्यामुळे मला कोणी आवरण्याची गरज नाही.

उलट तुमची नैतिकता काय आहे? याचे पुरावे माझ्याकडे असून योग्य वेळी ते जनतेसमोर आणेन. 'बायकांत बहु बालिश बडबडला' अशी आजबेंची अवस्था झाल्याची टीकाही प्राजक्ता धस यांनी केली. मोर्चात पिंपळा, पुंडी, पांढरी, सोलेवाडी, तवलवाडी, इमनगाव, हनुमंतगाव, शिदेवाडी यांसह विविध ठिकाणच्या जमिनी बळकावल्याचा आरोप बाळासाहेब आजबे यांनी प्राजक्ता धस यांना उद्देशून केला होता.

त्याला उत्तर देतांना पुंडी येथील जमीन 2012 मध्ये कायदेशीररीत्या खरेदी केली असून, सर्व मालमत्तेचा उल्लेख निवडणूक शपथपत्रात व आयकर विवरणपत्रात स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व व्यवहारांत कोणताही गैरव्यवहार झाला असल्यास त्याचे साठेखत, सातबारा किंवा पुरावे जनतेसमोर आणावेत, असे खुले आव्हान प्राजक्ता धस यांनी दिले. तसेच दादेगाव देवस्थानच्या शेकडो एकर जमिनीबाबत आजबेंनी स्वतः स्पष्टीकरण द्यावे, असा पलटवारही त्यांनी केला.

आजबे नैराश्यात

पाच वर्षांच्या कार्यकाळात जनाधार तब्बल एक लाख मतांनी घसरल्याने आजबे राजकीय नैराश्यातून सुडाचे राजकारण करत आहेत. वैयक्तिक बदनामी करून राजकारण करण्याची मर्यादा ओलांडली गेल्याने आता राजकीय उत्तरामधून सूट न देता कायदेशीर मार्गानेच धडा शिकवणार असे म्हणत प्राजक्ता धस यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

suresh dhas, prajkta dhas
Suresh Dhas: बीडच्या जनआक्रोश मोर्चातून धोंडे, आजबे आक्रमक! सुरेश धस यांना घेरलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com