Beed News : आपल्या खात्यातल्या कामांसाठी कमी आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा वरचढ असल्याचे बोलून दाखविले आहे. आपण मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही, नो डिस्कस, करायचे म्हणजे करायचे, मी सांगेल तेच करायचे अशा त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तानाजी सावंत खरोखर मुख्यमंत्र्यांना डोईजड झालेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
तानाजी सावंत हे राज्याचे आरोग्यमंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. एका कार्यक्रमावेळी ते धाराशीवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या व्हिडिओतील संवादानुसार तानाजी सावंत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना एक काम सांगत आहेत. त्यावर कुलकर्णी डिस्कस करु, असे म्हणतात. त्यावर नो डिस्कस, मी सांगितले तर करायचे म्हणजे करायचे, मी मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही तर बाकी काय, असे ते म्हणतात. पुन्हा उचलून फेकू, नंतरचे नंतर बघू असेही तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी सत्तांतरापूर्वी शिवसेनेचे आमदारांचा गुहावटीतील ‘भार’ तानाजी सावंत यांनी उचलल्याने त्यांचा कॉन्फिडन्स असा वाढलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून समर्थकांशी व अधिकाऱ्यांशी बोलताना कायम मुख्यमंत्र्यांबाबत असेच वक्तव्य केली जातात. आजारी आरोग्य खाते व्हेंटिलेटरव जात असताना केवळ ‘तपासणी शिबिरे’ घेऊन चर्चेत राहणारे तानाजी सावंत अशा वक्तव्यांसाठीही कायमच चर्चेत असतात. या वक्तव्यानंतर तानाजी सावंत खरोखरच मुख्यमंत्र्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे बोलले जाते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा हा व्हिडिओ ट्विट केला आहे. या ट्विटमधून सुषमा अंधारे यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीका केली आहे. कोणीही यावं आणि टपली मारून जावं, अशी गृहखात्याची अवस्था झाल्याची टीका अंधारे यांनी केली आहे.
ट्विटमध्ये काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
"गृहखात्याची अवस्था कोणीही यावं आणि टपली मारून जावं, अशी झाली कधी कुख्यात गुन्हेगार गुंड पोलिसांना तालावर नाचवतात तर कधी सरकार दरबारचे मंत्री सरेआम इज्जत काढतात.. !!", असं सुषमा अंधारे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.