Prashant Bamb-Vikram Kale Clash : 'टीईटी'वरून राजकीय गदारोळ, भाजपचे प्रशांत बंब अन् राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंमध्ये जुंपली!

TET Exam Controversy: शिक्षकांच्या मागण्यांवरून राजकारण तापले आहे. शिक्षण क्षेत्रात उसळलेल्या आंदोलनावरून भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक आमदार विक्रम काळे आमनेसामने आले आहेत.
Prashant Bamb-Vikram Kale Clash.jpg
Prashant Bamb-Vikram Kale Clash.jpgSarkarnama
Published on
Updated on

संदीप लांडगे

Assembly Winter Session News : महायुती सरकारमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन आमदारांमध्ये 'टीईटी' च्या मुद्यावरून चांगलीच जुंपली आहे. आमदार प्रशांत बंब यांनी आक्रमक पावित्रा घेत आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची मागणी करत एक दिवसाचे आंदोलन कपातीची मागणी केली. तर मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे या मागणीला कडाडून विरोध दर्शवत शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना पत्र लिहित वेतन कपातीचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे.

शिक्षकांच्या मागण्यांवरून राजकारण तापले आहे. शिक्षण क्षेत्रात उसळलेल्या आंदोलनावरून भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक आमदार विक्रम काळे आमनेसामने आले आहेत. टीईटी परीक्षा, शाळाबंद आंदोलन, एक दिवसाच्या वेतन कपातीचे आदेश आणि शिक्षकांच्या मूलभूत हक्कांवरून दोन्ही बाजूंनी जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

शिक्षकांनी 5 डिसेंबर रोजी राज्यभर शाळाबंद आंदोलन केले. या आंदोलनाला शिक्षक संघटनांनी दिलेल्या एकत्रित पाठिंब्याने सरकारवर दडपण वाढत असतानाच भाजपचे आमदार बंब यांनी शिक्षकांच्या आंदोलनावर जोरदार प्रहार केला. 'शिक्षकांचा टीईटी परीक्षेला (TET Exam) विरोध म्हणजे आम्हाला विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू द्या असे सांगण्यासारखे आहे. शिक्षक जे शिकवतात त्यावरच टीईटी होते, मग भिती कशाची' असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

इतकेच नव्हे तर बनावट पदव्या, खोटी शालार्थ आयडी आणि शिक्षकांकडून कोट्यवधींची भ्रष्ट कमाई होत असल्याचा गंभीर आरोपही बंब यांनी केला. आंदोलन करणाऱ्या शिक्षकांचे निलंबन करण्यासाठी ते शिक्षण मंत्र्यांना पत्र देणार असल्याचे त्यांनी जाहीर केल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

Prashant Bamb-Vikram Kale Clash.jpg
Sanjay Shirsat Rajendra Janjal dispute : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांचे 'दबाव अस्त्र' पालकमंत्री संजय शिरसाट त्यांच्यावरच उलटवणार?

या आरोपांना प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र पाठवून त्यांनी 5 डिसेंबरच्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांच्या एका दिवसाच्या वेतनकपातीचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.

आमदार विक्रम काळे यांनी टीईटी सक्ती, जुन्या पेन्शन योजनेचा अनुत्तरीत प्रश्न, शाळांच्या टप्पा अनुदानातील व्यत्यय, भरती पोर्टलची निष्प्रभता आणि मराठी-हिंदी-उर्दू माध्यमातील घटती पटसंख्या या गंभीर समस्यांकडे शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधले. 'शिक्षक आपला घटनात्मक अधिकार वापरत शांततेने आंदोलन करत आहेत, त्यांना दंडित करणे अन्यायकारक आहे' अशी भूमिका काळे यांनी घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com