
Dharashiv 24 July, : माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सावंत कुटुंबीयांकडे असलेल्या साखर कारखान्यांकडे थकलेल्या ऊसबिलावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी साखर आयुक्तालय कार्यालयाकडे धाव घेतली आहे. येत्या आठ दिवसांत उसाच्या एफआरपीची रक्कम न मिळाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रणजित पाटील यांनी निवेदनातून दिला आहे.
माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या कुटुंबीयांचे धाराशिव व सोलापूर जिल्ह्यात कारखाने आहेत. यात ढोकी येथील भैरवनाथ शुगर संचलित तेरणा सहकारी साखर कारखाना, वाशी येथील भैरवनाथ शुगर संचलित शिवशक्ती साखर कारखाना, तर सोनारी येथे भैरवनाथ शुगर वर्क्स असे साखर कारखाना आहेत. या कारखान्याकडे गाळप केलेल्या ऊसाचे आठ कोटी वीस लाख रुपये थकले आहेत.
आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि केशव सावंत यांच्याकडे या साखर कारखान्यांचा (Sugar Factory) कारभार आहे. भैरवनाथ शुगर संचलित ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखान्याकडे २ कोटी रुपये, तर वाशी येथील भैरवनाथ शुगर संचलित शिवशक्ती साखर कारखान्याकडे तीन कोटी ६० लाख रुपये, तर सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्सकडे दोन कोटी पन्नास लाख रुपये थकले आहेत.
सावंत यांच्या ताब्यातील साखर कारखान्यांकडे थकलेल्या ऊसबिलासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव जिल्हाप्रमुख रणजित पाटील म्हणाले, माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कुटुंबीयांच्या कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाचे बिल येत्या आठ दिवसांत जमा करावे; अन्यथा साखर आयुक्तालयासमोर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आम्ही आयुक्तांना दिला आहे.
शेतकऱ्यांना ऊसबिलाच्या एफआरपीची रक्कम मिळावी, यासाठी आमचा आंदोलनाचा पहिला टप्पा असणार आहे. एफआरपीची रक्कम मिळाल्यानंतर आमचा आंदोलनाचा दुसरा टप्पा असणार आहे. त्यात सावंतांनी जो ऊसदर जाहीर केलेला होता. तोदेखील भूम, परांडा आणि वाशी भागातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही, तोही मिळावा, यासाठी आम्ही तीनही तालुक्यांत शिवसेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.