Thailand Job Scam : थायलंडच्या नोकरीच्या आमिषामागे मृत्यूचा सापळा; बीडच्या युवकाचा पत्नीला थरारक फोन, 800 भारतीय म्यानमारच्या जंगलात ओलीस!

25 youths from Maharashtra among 800 Indians trapped in Myanmar cyber scam camps after fake Thailand job offers : आंतरराष्ट्रीय सायबर माफियांच्या या मोठ्या जाळ्यामुळे खळबळ उडाली असून अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी बीड पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत थेट परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.
Thailand Job Scam
Thailand Job ScamSarkarnama
Published on
Updated on

Beed Police Thailand Scam Investigation : थायलंडमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचे स्वप्न दाखवत महाराष्ट्रातील 25 युवकांसह तब्बल 800 भारतीय नागरिकांना म्यानमार-थायलंड सीमेवरील कुप्रसिद्ध गोल्डन ट्रँगल परिसरातील अज्ञात छावण्यांमध्ये ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आंतरराष्ट्रीय सायबर माफियांच्या या मोठ्या जाळ्यामुळे खळबळ उडाली असून अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी बीड पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत थेट परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.

या प्रकरणाची सुरुवात बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका 24 वर्षीय तरुणापासून झाली. फेसबुकवरील जाहिरातीद्वारे त्याला बँकॉकमध्ये महिन्याला 70 हजार रुपये पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानुसार तो 4 जून रोजी पुण्याहून बँकाॅक येथे पोहोचला. मात्र तिथे पोहोचताच त्याला जबरदस्तीने म्यानमार सीमेवरील घनदाट जंगलात असलेल्या एका गुप्त छावणीत नेण्यात आले. आरोपींनी त्याचे पासपोर्ट आणि सर्व कागदपत्रे ताब्यात घेत त्याला बाहेरच्या जगापासून पूर्णपणे तोडून टाकले.

या छावण्यांमध्ये युवकांना अक्षरशः नरकयातना सहन कराव्या लागत असल्याचे समोर आले आहे. एका छोट्याशा खोलीत कोंडून ठेवत बंदुकीच्या धाकावर तब्बल 18-18 तास ऑनलाइन फसवणुकीचे (Online Scam) काम करण्यास भाग पाडले जात आहे. आदेश पाळण्यास नकार दिल्यास विजेचे शॉक देणे, अमानुष मारहाण करणे आणि मानसिक छळ केल्याची गंभीर माहिती पुढे आली आहे.

Thailand Job Scam
BJP Leader Gold Smuggling: भाजपच्या कामगार संघटनेच्या चिटणीसाला सोने तस्करीत अटक; मुंबई विमानतळावर 5 कोटींचे रॅकेट उघड

या भीषण परिस्थितीत अडकलेल्या पीडित युवकाने जीव धोक्यात घालून पत्नीला फोन केला. माझा जीव धोक्यात आहे, माझ्यासमोर तीन जणांना ठार मारण्यात आले, अशी आर्त विनंती त्याने केल्यानंतर या आंतरराष्ट्रीय मानव तस्करी आणि सायबर गुन्हेगारी रॅकेटचा पर्दाफाश झाला.

Thailand Job Scam
Eknath Shinde Shiv Sena Crime : एकनाथ शिंदेच्या शिलेदाराला स्वस्तातल्या सोन्याची भुरळ; 52.80 लाखांना लुटताच फडणवीसांच्या 'खाकी'कडून टोळी गजाआड

या प्रकरणाची गंभीर दखल घेत बीड पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांतील सर्व अडकलेल्या युवकांच्या सुरक्षित सुटकेसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत.

आम्ही संबंधित सर्व यंत्रणांशी सातत्याने संपर्कात आहोत. परराष्ट्र मंत्रालयाकडे अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचून सर्व युवकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

या घटनेमुळे परदेशातील नोकरीच्या आमिषाखाली सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सायबर गुलामगिरीच्या जाळ्याचा गंभीर चेहरा पुन्हा एकदा समोर आला असून सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातींवर विश्वास ठेवताना तरुणांनी अत्यंत सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com