Jayant Patil News
Jayant Patil NewsSarkarnama

Jayant Patil Allegation : 'शासन आपल्या दारी' मंडपांच्या अवाढव्य खर्चाचे टेंडर माझ्या हाती..

Maharashtra News : विरोधकांवर त्या मंचावरून टीका करायची. स्वतःचा उदोउदो करायचा हा नवीन उद्योग सुरू केला आहे.
Published on

NCP Political News : राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारच्या वतीने `शासन आपल्या दारी` हा कार्यक्रम सर्वत्र सुरू आहे. यावर विरोधी पक्षांकडून टीका होत असली तरी सरकार मात्र हा कार्यक्रम सर्वसामान्य लोकांच्या हिताचा असल्याचा दावा करत आहे. (Maharashtra News) या कार्यक्रमावर होणारा अफाट खर्च हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे.

Jayant Patil News
Parbhani BJP Politics : दुष्काळाच्या झळा तरीही गौतमी पाटीलचा लळा..

यावर राष्ट्रवादी (शरद पवार)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील गंभीर आरोप करत आपल्याकडे त्याचा पुरावा असल्याचा दावा केला आहे. जयंत पाटील यांनी या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. (NCP) शासन आपल्या दारीच्या एका कार्यक्रमासाठी फक्त मंडपाचा खर्च हा जवळपास २.२ कोटी इतका असल्याचे एक टेंडर माझ्या पाहण्यात आले.

सरकारने सरळसरळ लोकांच्या पैशांची उधळपट्टी लावली आहे. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम करायचे. (Maharashtra) भीती घालून सक्तीने लोकं जमवायची. शासकीय यंत्रणा, अधिकारी वर्ग यांना कामाला जुंपायचे. विरोधकांवर त्या मंचावरून टीका करायची. स्वतःचा उदोउदो करायचा हा नवीन उद्योग सुरू केला आहे.

एकीकडे शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे, राज्यातील काही भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे, पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागत नाही आणि दुसरीकडे पैशांची अशी उधळण सुरू आहे. "बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं" अशाने प्रश्न सुटत नसतात, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com