

Dharashiv News : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांनी अर्पण केलेले 247 किलो सोने व 3298 किलो चांदी वितळवण्याचा नव्याने ठराव करून मंदिर प्रशासनाने राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे मंजुरी मागितली असतानाच आता त्या प्रश्नावरून मंदिर प्रशासन विरुद्ध हिंदू जनजागृती समितीत वाद रंगला आहे. सोने चांदी वितळविण्यास कोर्टाने परवानगी नाकारल्याचा दावा हिंदू जनजागृती समितीने केला आहे. या प्रकरणी हिंदू जनजागृती समितीने प्रशासनाला ‘क्रिमिनल कंटेम्प्ट’चा (फौजदारी अवमान) इशारा दिला आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांनी अर्पण केलेले 247 किलो सोने व 3298 किलो चांदी वितळवण्याचा नव्याने ठराव करून मंदिर प्रशासनाने राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे मंजुरी मागितली आहे. प्रशासनाचा दावा आहे की, ते केवळ २००९ नंतरचे सोने वितळवणार आहेत. मात्र प्रशासनाचा हा दावा चुकीचा व न्यायालयाची दिशाभूल करणारा आहे.
उच्च न्यायालयाने 23 जानेवारी 2025 रोजीच प्रशासनाची 2009 नंतरचे सोने वितळवण्याची याचिका फेटाळून लावली होती. तरीही नव्याने ठराव करून शासनाकडे परवानगी मागणे, हा न्यायालयाचा अवमान असल्याच हिंदु जनजागृती समितीचे मत असून या संदर्भात ‘हिंदु जनजागृती समिती’च्या अधिवक्ता सुरेश कुलकर्णी व अधिवक्ता उमेश भडगांवकर यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी, राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव आणि विधी व न्याय विभागाचे सचिव यांना ‘न्यायालयाच्या अवमाननेची नोटीस’ बजावली आहे.
तुळजाभवानी मंदिरातील सोने वितळवण्यावरून मंदिर प्रशासनाविरुद्ध हिंदू जनजागृती समितीचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यातच आता प्रशासनाने ‘क्रिमिनल कंटेम्प्ट’चा (फौजदारी अवमान) इशारा दिला असल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.