Tuljabhvani Temple Development Plan : तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा भाविकांना लाभ किती ?

Discover how the Tuljabhavani pilgrimage site development plan aims to improve facilities and offer better experiences for devotees and visitors. : तुळजापूर विकास आराखड्याची सुरूवात 1992 मध्ये तिर्थक्षेत्र विकास योजना या माध्यमातून झाली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी योजना जाहीर केली.
Tuljabhavani Temple Development Plan News
Tuljabhavani Development Temple Plan NewsSarkarnama
Published on
Updated on

जगदीश कुलकर्णी

Marathwada News : तुळजापूर विकास आराखडा राज्य सरकारने मंजूर केला आहे. तथापि त्याचा भाविकांना किती फायदा होणार? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. मागील 32 वर्षात तुळजाभवानी मंदीर विकास योनजेअंतर्गत अनेक कामे झाली, परंतु याचा भाविकांना किती फायदा झाला ह संशोधनाचा विषय आहे. नव्याने मंजूर झालेल्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबद्दल तुळजापूरकरांना निश्चित किती माहिती आहे? याबद्दलही साशंकता आहे.

तुळजापूर विकास आराखड्याची सुरूवात 1992 मध्ये तिर्थक्षेत्र विकास योजना या माध्यमातून झाली. तत्कालीन मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तिर्थक्षेत्र विकास योजना जाहीर केली. (Ranajagjeetsinh Patil) 3 कोटी 60 लाख रूपये तुळजापूरसाठी मंजूर झाले. नगरविकास खात्याचे राज्यमंत्री अशोक चव्हाण असताना त्यांनी तुळजापूरमध्ये दिवसभर फिरून विकास आराखड्याच्या कामाला सुरूवात केली. तत्कालीन मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त करंदीकर तीर्थक्षेत्र विकास योजनेचे अध्यक्ष होते.

या विकास आराखड्यात पाण्याची टाकी आणि अन्य कामे त्यावेळेच्या परिसर अभियांत्रिकी खात्यामार्फत झाली. 1993 च्या भूकंपानंतर पुन्हा काही बाबतीत दुर्लक्ष झाले. (BJP) त्यानंतर राज्याचे तत्कालीन अर्थराज्यमंत्री दिलीपराव देशमुख हे राज्याच्या मंत्रिमंडळात असताना त्यांनी तुळजापूर विकासासाठी मोठे पाऊल उचलले. राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख झाल्यानंतर त्यांनी 325 कोटी रूपये देऊन तुळजापूर प्राधिकरणाचा आराखडा जाहीर केला.

Tuljabhavani Temple Development Plan News
Tuljabhavani Pilgrimage Development Plan : तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास अखेर मान्यता

धाराशिवचे जिल्हाधिकारी हे तुळजापूर प्राधिकरणाचे अध्यक्ष झाले. तसेच वेगवेगळ्या खात्याचे प्रतिनिधी, तुळजापूरचे आमदार, नगराध्यक्ष हे प्राधिकरणाचे सदस्य झाले. त्यानंतर मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ येथे आल्यानंतर वैष्णव देवीच्या धर्तीवर आणि वैश्विक दर्जाचे तुळजापूर तीर्थक्षेत्र करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. राज्यात त्यानंतर महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले आणि कोरोनाची भयंकर लाट आल्यामुळे तुळजापूर विकास आराखड्यासाठी गती देता आली नाही.

Tuljabhavani Temple Development Plan News
Marathwada Political News : धाराशिव रेल्वे पुनर्विकास कार्यक्रमातून मंत्री सावंत यांना कुणी डावलले ?

तथापि अनेक कामांना उद्धव ठाकरे यांच्या काळात निधीही आला. त्यानंतर आता राज्यात महायुतीची सरकार आले. तुळजापूरात विकास आराखडा राबविण्यासाठी तुळजापूर मंदिर समितीनेच आराखडा तयार केलेला आहे. अधिकारी पातळीवर अनेक निण॔य झाले. त्यामध्ये तुळजापूर शहरवासीयांचा यामध्ये कितपत सहभाग आहे हा संशोधनाचा विषय आहे. तुळजापूर नगरपालिकेची घाटशीळ वाहनतळाची जागा तुळजाभवानी मंदिराकडे हस्तांतरीत मागील दोन महिन्यांपूर्वीच करण्यात आलेली आहे.

Tuljabhavani Temple Development Plan News
Dharashiv DPDC News : पालकमंत्र्यांच्या मनमानी कारभाराला मुख्यमंत्री फडणवीसांकडून लगाम! धाराशिव मधील 268 कोटीच्या कामांना स्थगिती

दरम्यान आता तुळजापूर विकास आराखड्यामध्ये नेमके काय काय आणि कशाप्रकारे बदल केले? हे पाहणे महत्त्वाचे आहे. तुळजापूर विकास आराखडा राबविण्यात यावा यासाठी तुळजापूरचे सत्ताधारी आमदार राणाजगजितसिंह पाटील हे आग्रही होते, यात ते यशस्वी झाले आहेत. तथापि तुळजापुरातील व्यापारी, पुजारी या महत्वाच्या घटकांचा आणि त्यांनी केलेल्या सूचनांचा किती विचार आराखडा अंतिम करतांना केला गेला हे लवकरच स्पष्ट होईल.

Tuljabhavani Temple Development Plan News
Marathwada Drought News : दुष्काळ मुक्तीच्या पोकळ घोषणा! 35 टीएमसी पाणी वळवण्यात कायदेशीर अडथळा!

स्थानिक व्यापारी, नागरिकांचा विचार व्हावा..

तसेच भौगोलिकदृष्ट्या दश॔नमंडप करताना भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. यापूर्वी तुळजाभवानी मंदिर समितीने केलेला दश॔नमंडप नगररचना खात्याची तसेच वेगवेगळ्या खात्यांची परवानगी न घेताच केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे आल्यानंतर दश॔नमंडपाच्या एफएसआयबाबत विचारणा करून तत्कालीन अधिकाऱ्यांना घाम फोडला होता. दरम्यान तुळजापूर विकास आराखडा राबविताना जे व्यापारी, जागामालक विस्थापित होणार आहेत त्यांच्या पुनर्वसनाचा सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Tuljabhavani Temple Development Plan News
BJP Politics : आता भाजपची बारी ; एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे दोघांना धक्का देण्याची तयारी?

तुळजापूरचा विकास आराखडा राबवताना यापूर्वी महाद्वारातूनच भाविकांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी तुळजापूरात आंदोलनेही झाली आहेत. विकासाच्या बाबतीत तुळजाभवानी मंदिर समितीने यापूर्वी मंदिरातील अंतर्गत सुमारे 58 कोटी रूपयांची कामे सुरू केलेली आहेत. पूर्वीचे प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पाडलेले आहे. तसेच तुळजाभवानी मंदिरातील काही उपदैवते हे पापनास तीर्थकुंडाकडे काही दिवसांपूर्वीच हलविण्यात आलेली आहेत. यासर्व बाबी होताना प्रशासनाने पुण॔तः गोपनीयता बाळगली आहे.

Tuljabhavani Temple Development Plan News
Dharashiv BJP District President : धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच; कोणाची वर्णी लागणार उत्सुकता शिगेला

विकास आराखड्यात अनेकांचे योगदान

तुळजापूर विकासासाठी घोषणांचा पाऊस असला तरीही ज्या नेत्यांनी यापूर्वी काम केले ते दुर्लक्षून चालणार नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील, धाराशिवचे माजी पालकमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी पूर्णपणे अनुदानित बोरी धरणाची पाणीपुरवठा योजना भाविकांसाठी तुळजापूरला दिलेली आहे. तुळजापूरचे यात्रा अनुदान मंजुर करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तुळजापूरचे माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे प्रति वर्षाला यात्रा अनुदान साडे चार कोटी रूपये मंजूर केलेले आहे.

Tuljabhavani Temple Development Plan News
Tuljapur Drug Case : तुळजापूर ड्रग्जप्रकरणी मोठी अपडेट; मुंबईपर्यतचे राजकीय कनेक्शन? तब्बल 10 हजार पानाचे आरोपपत्र

तुळजाभवानी मंदिराचा विकास आराखडा राज्य सरकारने मंजूर केलेला आहे. तुळजाभवानी मंदिर समितीचे धाराशिवचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आहेत. तर उपविभागीय अधिकारी, तुळजापूरचे तहसीलदार, आमदार, नगराध्यक्ष हे विश्वस्त आहेत तथापि राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका रखडल्याने तुळजापूरचे नगराध्यक्ष मंदिर समितीच्या विश्वस्त म्हणून सध्या कार्यरत नाही. एकूणच तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला अंतिम मंजूरी मिळाली असली तरी याची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते यावर बरेच अवलंबून असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com