Thackeray Brothers Protest : ठाकरे बंधूंचा निवडणूक आयोगाविरोधात पुन्हा एल्गार! मुंबईत प्रचंड जनमोर्चाची घोषणा; राज ठाकरेंचा थेट इशारा

Uddhav Thackeray Raj Thackeray Mumbai protest : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येत मुंबईत जनमोर्चा काढणार असल्याची चर्चा आहे. निवडणूक आयोगासंदर्भातील मुद्द्यांवर ठाकरे बंधूंची भूमिका आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या.
Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama
Published on: 
Updated on: 

MNS-Shivsena UBT News : 'एसआयआर'च्या माध्यमातून मतदार याद्यांमध्ये होत असलेल्या बदलांवर आयोगातील दोन आयुक्तांनी आक्षेप घेतले होते. परंतु मुख्य निवडणूक आयुक्तांनी त्या आक्षेपांकडे दुर्लक्ष केले, असा आरोप करत विरोधकांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारविरोधात रान पेटवले आहे. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीतील निकालावर देखील विरोधकांनी शंका उपस्थित केल्या होत्या.

ईव्हीएमवर संशय व्यक्त करत पश्चिम बंगालमधील धक्कादायक निकालांचा दाखल विरोधकांकडून दिला जात होता. त्यानंतर निवडणूक आयोगातील दोन प्रमुख अधिकाऱ्यांनी देखील आक्षेप नोंदवल्याची माहिती समोर आली. यावरून देशभरातील राजकीय वातावर तापले आहे. महाराष्ट्रात राज आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल राज्यातील विद्यमान सरकारांनी राजीनामे देऊन इथे मतपत्रिकेवर पुन्हा निवडणूका घेण्याची मागणी केली.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Ajit Navle on Drought : GR आला, पण मदतीचा आकडा गायब! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नेमकं काय मिळणार? अजित नवलेंचा सरकारला थेट सवाल

तसेच ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, यासाठी देखील देशात मोठे आंदोलन उभे राहू पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या ४ आॅक्टोबर रोजी मुंबईत एक जनमोर्चा काढण्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करत त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहबे ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोघे मिळून हा मोर्चा काढणार आहेत.

सस्नेह जय महाराष्ट्र, देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने 'एसआयआर'च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या ४ ऑक्टोबर २०२६ ला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Drought Declared : बळीराजासाठी मोठी बातमी! दुष्काळ जाहीर होताच शेतकऱ्यांना मिळणार 'या' 12 सवलती; वाचा सविस्तर!

या मोर्चाच्या आयोजनात जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे आणि हा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत.

अर्थात महाराष्ट्रातील जनतेलाच आवाहन आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हा. बाकी मोर्च्याची वेळ आणि ठिकाण लवकरच कळवण्यात येईल. तेंव्हा एसआयआरविरोधातील या जन मोर्च्यात भेटूया ! या , देशातील लोकशाही आणि या देशाचे संविधान वाचवण्यासाठी एकत्र या, असे आवाहन राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com