MLA tension : वडेट्टीवारांनी वाढवले आमदारांचे टेन्शन; शेतकऱ्यांसाठी सहा महिन्यांचे मानधन देण्याची केली घोषणा

Vijay Vadettiwar News : सहा महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांनी सहा महिन्याचे मानधन द्यावे, असे आवाहन करून वडेट्टीवारांनी करीत सर्वांचे टेन्शन वाढवले आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ भाजपनेही आपल्या आमदारांना एक महिन्याने मानधन पुरग्रस्तांसाठी देण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवारांनी मात्र सहा महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. उद्याच मुख्यमंत्र्यांना यासाठी पत्र देणार आहे. भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांनी सहा महिन्याचे मानधन द्यावे, असे आवाहन करून वडेट्टीवारांनी करीत सर्वांचे टेन्शन वाढवले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्र काढून एक महिन्याचे वेतन आमचे आमदार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजपचे नेते आणि महसूलमंत्री यांनी एक महिन्यांचे मानधन देण्यात येणार असल्याचे सांगितले. आमचे आमदार, खासदार आणि कार्यकर्तेसुद्धा मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र वडेट्टीवारांनी थेट सहा महिन्यांचे वेतन देतो, असे सांगून सर्वच आमदारांना कामाला लावले आहे.

Vijay Wadettiwar
Ajit Pawar: भुजबळांनी सुरुवात केली, अजितदादांनी निर्णय उचलून धरला: राष्ट्रवादीचे सर्व आमदार, खासदारांना सूचना

मदतीबाबत राज ठाकरे यांचे काय म्हणणे आहे हे मला माहिती नाही. मात्र किमान 50 हजार रुपये या प्रमाणे हेक्टरी मदत केल्याशिवाय या संकटातून शेतकरी सावरला जाणार नाही ही वस्तुस्थिती आहे. यावर्षी पावसाने कहर केला आहे. दरवर्षी पुराचा फटका चंद्रपूर शहराला बसतो. केवळ थातूरमातूर नदीचा खोलीकरण केले जाते. सुरक्षा भिंत बांधली गेली असती तर चंद्रपूर शहराचा पुराचा धोका टाळता आला असला असेही ते म्हणाले. आम्ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा जिल्ह्यात मोर्चे काढू, इतकी भयावह परिस्थिती सध्या आहे. याची गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने मदत केली पाहिजे.

Vijay Wadettiwar
Eknath Shinde: "लय देवानं परेशान केलंय...." धाराशिवच्या शेतकऱ्यांची हतबलता! पुराच्या पाहणीसाठी गेलेल्या एकनाथ शिंदेंना शेतकऱ्यांनी घेरलं

राज्य सरकार बुधवारी बांधावर गेले ते औपचारिकता पूर्ण करण्यासाठी गेले का? असे दिसून येते. मुख्यमंत्री म्हणतात की राजकारण करू नका. जर ते बांधावर जात आहेत तर किती मदत करणार हे जाहीर का करीत नाही. शेतकऱ्यांची बनवाबनवी करायची अशी नियत सरकारची दिसत आहे. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे गेलो तर दोन एकरपर्यंत शेतकऱ्यांना सतरा हजारपर्यंत मदत मिळणार आहे. शेत मालावर संकट आहे. त्यामुळे एक क्विंटलसुद्धा सोयाबीन हाती येणार नाही. या सरकारने पीक विम्याचा वाटोळे केले, असा आरोप त्यांनी केला.

Vijay Wadettiwar
Eknath Shinde first reaction : मदतीवरील जाहिरातीच्या फोटोवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'राजकारण बाजूला...'

निवडणुकीच्या पूर्वी एक रुपयात पीक विमा घोषणा केली होती. त्यानंतर त्यामध्ये जे काही निकष लावले त्यामुळे संकटात शेतकऱ्यांना कुठली मदत मिळेल असे वाटत नाही. सरकारने सर्व कामे थांबवावी, शेतकऱ्यांना किमान 50 हजार रुपये हेक्टरी मदत करावी.

शेतकऱ्यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री गेले उपमुख्यमंत्री गेले. आपल्या फोटोचे स्टिकर लावून परतले. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अशी घोषणा या सरकारने केली होती. पुढच्या महिन्यात सरकारच एक वर्ष पूर्ण करणार आहे. मात्र कर्जमाफीची अद्याप घोषणा केलेली नाही. यावरून सरकारी नियत दिसून येते असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

Vijay Wadettiwar
Tanaji Sawant : पुरग्रस्तांच्या मदत किटवर नेत्यांचे फोटो का? शिंदेंची बाजू सावरण्यासाठी तानाजी सावंतांची धडपड, मंत्रिपद फिक्स झाले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com