Political News : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे आणखी नेते संपर्कात असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. (Ashok Chavan Resignation)
'भाजपकडून काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा करण्यात आली होती. पण आता काँग्रेसव्याप्त भाजप अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही वर्षानंतर भाजपचा अध्यक्ष हा देखील काँग्रेसमधून आला असेल.सगळी भाडोत्री लोकं घेतली जात आहेत. बाजारबुणगे घेतले जातआहेत. भाजपमधील निष्ठावंत आज सतरंज्या उचलत आहेत', असा टोला ठाकरे (Uddhav Thackeray )यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान नरेंद्र मोदी अबकी बार 400 पार घोषणा देत आहेत. जर 400 पार होणार तर मग दुसऱ्याचे पक्ष का फोडत आहात. तिकडे बिहारामध्ये नितीश कुमार यांना तर इकडं अशोक चव्हाण यांना घेतलं जातंय. अजित पवारांना घेतलं. मिंद्देंना घेतलं. 10 वर्ष कामं केलं असतं तर ही वेळ आली नसती, असा जोरदार हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला.
काल परवापर्यंत जागा वाटपामध्ये अशोक चव्हाण भाग घेत होते. आम्हाला ही जागा पाहिजे म्हणून सांगत होते. पण आज ते तिकडे गेले. राज्यसभेची जाग त्यांना देतात वाटतंय. प्रत्येक जण आपलं बघतोय पण शेतकऱ्यांचे काय चाललंय हे बघायला कोणाला वेळ नाही. मी मुख्यमंत्री असताना सुरुवातीलाच शेतकऱ्यांची कर्ज माफी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.