Umarga Upsarpanch Election : दोघांना समान मते पडली अन्‌ सरपंचांनी विशेष मतदान करत उपसरपंचपदही स्वतःच्या गटाचा केला

उमरगा तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीपैकी तेरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी मंगळवारी (ता. १०) संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात निवड प्रक्रिया झाली.
Umarga Upsarpanch Election
Umarga Upsarpanch ElectionSarkarnama
Published on
Updated on

उमरगा (जि. उस्मानाबाद) : उमरगा तालुक्यातील एकुरगा ग्रामपंचायतीच्या (Gram Panchyat) निवडणुकीत (Election) चार पॅनेल होते. नूतन सरपंच (Sarpanch) पद्माकर कुन्हाळे यांच्या पॅनेलचे अकरापैकी पाच सदस्य निवडून आले होते. उपसरपंचपदाचे त्यांचे उमेदवार चंद्रकांत कुंभार यांना पाच मते मिळाली, तर दुसऱ्या पॅनेलचे उमेदवार बसवेश्वर करके यांना सहा मते मिळाली. सरपंच कुन्हाळे यांनी कुंभार यांना एक मतदान दिल्याने दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी सहा समान मतदान झाले. त्यानंतर सरपंच कुन्हाळे यांनी दुसरे विशेष अतिरिक्त मतदान कुंभार यांना दिल्याने ते उपसरपंच झाले. (Unopposed election of upsarpanches of eleven out of 13 villages in Umarga)

दोन मत देण्याच्या सरकारच्या निर्णयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. त्यावर खंडपीठाने समसमान मते मिळाली तरच सरपंचांना दुसरे अतिरिक्त विशेष मत वापरता येईल, असे सांगितले होते. त्याचा फायदा कुन्हाळे यांच्या पॅनेलला झाला आहे.

Umarga Upsarpanch Election
Shinde Group News : शिंदे गटातील आमदाराने स्पष्टच सांगितले : ‘मुख्यमंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्ताराला होकार; पण...’

उमरगा तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीपैकी तेरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी मंगळवारी (ता. १०) संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात निवड प्रक्रिया झाली. अकरा ग्रामपंचायतीच्या उपसरंपचाची निवड बिनविरोध झाली तर दोन ग्रामपंचायतीत निवडणूक झाली. सरपंचपदासाठी थेट निवडणूक झाल्याने उपसरपंचपदासाठी मोठी स्पर्धा दिसून आली. निवड प्रक्रियेदरम्यान नूतन सरपंचांचाही पदग्रहण सोहळा झाला.

Umarga Upsarpanch Election
Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच महामंडळाचेही वाटप तातडीने करा : शिंदे गटातील आमदार आक्रमक

येणेगुर ग्रामपंचायतीत नुतन सरपंच रेखा गुंजोटे यांच्या अध्यक्षतेखाली, अध्यासी अधिकारी एस. एस. माशाळकर यांच्या उपस्थितीत विजयानंद सोनकटाळे बिनविरोध उपसरपंच झाले. केसरजवळगा ग्रामपंचायतीत नुतन सरपंच पुजा पटवारी यांच्या अध्यक्षतेखाली, अध्यासी अधिकारी श्री. करबलवाड यांच्या उपस्थितीत अझरोद्दीन इनामदार यांना बिनविरोध उपसरपंचाची संधी मिळाली.

Umarga Upsarpanch Election
Solapur DPC : भाजपकडून कल्याणशेट्टी, आवताडे, परिचारक, मोहिते पाटील, तर शिंदे गटाकडून पाटील, सावंत, शिंदे यांना संधी

कोथळीत नुतन सरपंच लक्ष्मीबाई सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली, अध्यासी अधिकारी एस.एस. राऊत यांच्या उपस्थितीत बाबासाहेब पाटील बिनविरोध उपसरपंच झाले. भुसणी ग्रामपंचायतीत नुतन सरपंच पोर्णिमा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली, अध्यासी अधिकारी एस. जी. पाटील यांच्या उपस्थितीत दशरथ मंडले बिनविरोध उपसरपंच झाले.

Umarga Upsarpanch Election
Solapur News : भाजप आमदाराच्या मुलाविरोधात कोर्टाने दिला कारवाईचा आदेश

बेळंब येथे नुतन सरपंच सत्यभामाबाई बाबशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली, अध्यासी अधिकारी श्री. सोनकांबळे यांच्या उपस्थितीत कस्तुरबाई बंदिछोडे बिनविरोध उपसरपंच झाले. माडज ग्रामपंचायतीत नुतन सरपंच सारिका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, अध्यासी अधिकारी के. बी. भांगे यांच्या उपस्थितीत उपसरपंचपदी बलभिम काळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

Umarga Upsarpanch Election
Amravati Vidhan Parishad : अमरावतीसाठी राष्ट्रवादीही प्रचंड आग्रही : महाआघाडीत जागावाटपावरून पेच

चिंचोली (भूयार) येथे नुतन सरपंच उषा बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली, अध्यासी अधिकारी राजेंद्र कानडे यांच्या उपस्थितीत उपसरपंचपदी प्रमोद गायकवाड यांची बिनविरोध उपसरपंच झाले. नारंगवाडीत नुतन सरपंच शेखर घंटे यांच्या अध्यक्षतेखाली, अध्यासी अधिकारी श्री. कोरडे यांच्या उपस्थितीत कुमार पवार बिनविरोध उपसरपंच झाले.

सुंदरवाडी ग्रामपंचायतीत नुतन सरपंच कृष्णाबाई सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली, अध्यासी अधिकारी बी.एम. जाधव यांच्या उपस्थितीत हरिचंद्र फुलचंद जाधव बिनविरोध उपसरपंच झाले. कलदेवलिंबाळा ग्रामपंचायतीत नुतन सरपंच महादेव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली, अध्यासी अधिकारी आर. आर. गायकवाड यांच्या उपस्थितीत सुनिता पावशेरे यांना बिनविरोध उपसरपंचपदाची संधी मिळाली.

चिंचोली (जहागीर) ग्रामपंचायतीत नुतन सरपंच विद्या ब्याळे यांच्या अध्यक्षतेखाली, अध्यासी अधिकारी रमजान पठाण यांच्या उपस्थितीत उपसरपंचपदी विठ्ठल गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान, आलुरच्या नुतन सरपंच लिलावती जेऊरे यांच्या अध्यक्षतेखाली अध्यासी अधिकारी कदम यांच्या उपस्थितीत उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत एकुण सतरा पैकी १२ सदस्य व सरपंच जेऊरे यांचे एक असे १३ मतदान जितेंद्र पोतदार यांना मिळाल्याने ते निवडूनआले, तर काजल उमाशेट्टे यांना पाच मते मिळाली.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com