Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच महामंडळाचेही वाटप तातडीने करा : शिंदे गटातील आमदार आक्रमक

मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या २६ जानेवारीच्या अगोदर करण्यात यावा, अशी सर्व आमदारांची इच्छा आहे.
MLA Narendra Bhondekar
MLA Narendra BhondekarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ‘‘मंत्रिपद कोणाला द्यायचे, कुणाला द्यायचे नाही, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोघांनी ठरवायचं आहे. मात्र, आमच्या सर्वांची एकच विनंती आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) लवकरात लवकर करावा. मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच महामंडळांचेही वाटप तातडीने व्हायला हवे. त्यामुळे ज्यांना कोणाला ते पद मिळेल, त्यांना काम करण्यासाठी संधी मिळेल. मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या २६ जानेवारीच्या अगोदर करण्यात यावा, अशी सर्व आमदारांची इच्छा आहे,’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर (MLA Narendra Bhondekar) यांनी सांगितले. (Cabinet expansion and allotment of Mahamandal's also immediately : MLA Narendra Bhondekar)

मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्याने आमदार बच्चू कडू यांच्यासह अनेक आमदारांकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार भोंडेकर यांनी सावध पवित्रा घेत नाराजी नाही पण आमदारांचा स्वभाव आक्रमक आहे, असे सांगून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

MLA Narendra Bhondekar
Solapur DPC : भाजपकडून कल्याणशेट्टी, आवताडे, परिचारक, मोहिते पाटील, तर शिंदे गटाकडून पाटील, सावंत, शिंदे यांना संधी

आमदार भोंडेकर म्हणाले की, शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी वगैरे काही नाही. बाळासाहेबांची शिवसेना हा आक्रमक पक्ष आहे. आमच्यात कुणी नाराज नाही. आम्ही सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. मंत्रीपद कोणाला द्यायचे, कुणाला द्यायचे नाही, हे या दोघांनी ठरवायचं आहे. मात्र, आमच्या सार्वांची एकच विनंती आहे की, मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर करावा. मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच महामंडळांचेही वाटप लवकरात लवकर करण्यात यावे. जेणेकरून ज्यांना कोणाला ते मिळेल, त्यांना काम करण्यासाठी संधी मिळेल. निवडणुकीच्या अगोदर सहा महिने दिलं तर हे आमदार मतदारसंघ पाहतील का? त्या खात्याचे काम पाहतील? त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार हा येत्या २६ जानेवारीपूर्वी करण्यात यावा, अशी आम्हा आमदारांची इच्छा आहे.

MLA Narendra Bhondekar
Solapur News : भाजप आमदाराच्या मुलाविरोधात कोर्टाने दिला कारवाईचा आदेश

मंत्रिमंडळ विस्ताराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होकार आहे. पण काही भौगोलिक, विभागीय विषय असतात. काही समीकरणं असतात. त्यामुळे थोडंसं कुठंतरी अडलं असावं, असं मला वाटतं. पण, मंत्रिमंडळ विस्ताराचा अंतिम मुहूर्त ठरलेला आहे, लवकरच तुम्हाला तो दिसेल, असे सांगून भोंडेकर म्हणाले की, आपल्या नेत्याला न्याय मिळेल, अशी माझ्या कार्यकर्त्याला खात्री आहे. पण, मतदारसंघात कामं भरपूर मिळत आहेत, त्यामुळे केवळ मंत्रिपदाचा प्रश्न राहिलेला नाही. पण सर्वांचं एकच म्हणणं आहे की, लवकरात लवकर विस्तार व्हावा.

MLA Narendra Bhondekar
Amravati Vidhan Parishad : अमरावतीसाठी राष्ट्रवादीही प्रचंड आग्रही : महाआघाडीत जागावाटपावरून पेच

मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे कुठे अडले आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसच सांगू शकतात. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार अंतिम स्वरूपात आहे, त्यामुळे त्याची तारीख कधीही जाहीर होऊ शकते. आम्हा सर्व आमदारांना २६ जानेवारीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, आमच्यामध्ये कोणीही नाराज नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडू यांनी व्यक्त केलेली नाराजी नसून ती त्यांची आक्रमकता आहे, असेही आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com