Vaibhav Chavan Death : बोगस प्रमाणपत्रांद्वारे सरकारी नोकरी मिळवणाऱ्यांचे रॅकेट उघड करणाऱ्या वैभवचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ

Beed Fake Sports Certificate Scam : वैभव हा कराटे स्पर्धांमधील उत्कृष्ट खेळाडू होता. त्याच्याकडे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांची प्रमाणपत्रे होती. मात्र, बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवलेल्या नागनाथ विष्णू साबळे याच्याविरोधात त्याने पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा आयुक्तालयाकडे तक्रार केली होती.
Vaibhav Chavan, who exposed the fake sports certificate scam in Maharashtra, was found dead in Imamapur village of Beed district.
Vaibhav Chavan, who exposed the fake sports certificate scam in Maharashtra, was found dead in Imamapur village of Beed district.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed News, 06 Nov : बोगस खेळाडू प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी मिळवणाऱ्यांचे रॅकेट उघडकीस आणणाऱ्या वैभव चव्हाण या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बीड तालुक्यातील इमामपूर शिवारात एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. विशेष म्हणजे, त्याच्या अंगावर मारहाणीच्या जखमा असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर वैभवच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील रहिवासी असलेला वैभव चव्हाण दोन वर्षांपूर्वी धाराशिव पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रयत्नशील होता. २०२४-२५ मध्ये त्याने पोलीस भरतीसाठी खेळाडू कोट्यातून अर्ज केला होता. मात्र, त्याच्याइतकेच गुण असलेल्या एका उमेदवाराने खेळाडू असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली. त्यामुळे वैभवची संधी हुकली होती. यानंतर त्याने या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला आणि बोगस क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे नोकऱ्या मिळवून देणारे मोठे रॅकेट उघडकीस आणले.

वैभव हा कराटे स्पर्धांमधील उत्कृष्ट खेळाडू होता. त्याच्याकडे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांची प्रमाणपत्रे होती. मात्र, बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवलेल्या नागनाथ विष्णू साबळे याच्याविरोधात त्याने पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा आयुक्तालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे तपास सुरू झाल्यानंतर बोगस प्रमाणपत्रांचे मोठे रॅकेट समोर आले. या प्रकरणात राज्यातील १४ पोलीस कर्मचाऱ्यांसह काही क्रीडा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. तसेच बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्या कुराश असोसिएशनच्या अध्यक्ष आणि सचिवांसह संबंधित जिल्हाध्यक्षांविरोधातही गुन्हे दाखल झाले होते.

Vaibhav Chavan, who exposed the fake sports certificate scam in Maharashtra, was found dead in Imamapur village of Beed district.
Sharad Pawar : प्रफुल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट, अमित शाह यांच्या सोबतच्या बैठकीबाबत चर्चा?

दरम्यान, या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर वैभवला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावा करण्यात आला होता. सप्टेंबर २०२६ मध्ये पुणे गुन्हे शाखेने कुराश असोसिएशनच्या अध्यक्ष आणि सचिवांना अटक केली होती. त्यानंतरही वैभवच्या जीविताला धोका असल्याचे तो मित्रांना सांगत होता. आपल्याला आणि आपल्या मित्राला धोका असल्याचे त्याने काही रेकॉर्डिंगमध्ये नमूद केले होते.

Vaibhav Chavan, who exposed the fake sports certificate scam in Maharashtra, was found dead in Imamapur village of Beed district.
Raju Shetti : अखेर राजू शेट्टींचं आंदोलन स्थगित! 3,900 रुपये पहिली उचल, नेमका फॉर्म्युला काय ठरला?

'माझा मृत्यू कोणत्याही परिस्थितीत झाला, तरी त्याला कुराश संघटना जबाबदार असेल,' असे वैभवने एका रेकॉर्डिंगमध्ये म्हटल्याची माहिती समोर आली आहे. ही रेकॉर्डिंग त्याने आपल्या मित्राकडे पाठवून ठेवली होती. या रेकॉर्डिंग आता समोर आल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. गुरुवारी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमामपूर शिवारात वैभवचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या अंगावरील जखमांमुळे आणि यापूर्वी मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे वैभवच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, त्याचा मृत्यू आत्महत्या आहे की घातपात, याचा तपास करण्याची मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.