Vaidyanath Sugar Factory Election: जवाहर संस्था आणि बाजार समित्यांच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे.या निवडणुकीत पुन्हा एकदा मुंडे बहीण-भावामध्ये लढत होणार आहे.यामुळे यावेळी बीडची जनता कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Vaijnath sugar factory election announced, voting will be held on 'this' day)
21 संचालक पदासाठी कारखान्याची ही निवडणूक होत आहे.10 मे ते 16 मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.17 मे ला अर्जाची छाननी होईल. 18 मे ते 1 जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 2 जून रोजी चिन्ह वाटप होईल, तर 11 जूनला मतदान प्रक्रिया पार पडेल आणि 12 जून रोजी मतमोजणी होईल. (Dhananjay Munde vs Pankaja Munde)
गेल्या काही वर्षांपासून कारखान्यावर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे वर्चस्व आहे. पण यावेळी कारखान्यावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंडे बहीण भावातील संघर्ष पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत मुंडे बहिण भाऊ वेगवेगळे पॅनल उभे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता वैद्यनाथ कारखान्यावर नेमकी कोणाची सत्ता येणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.