Vilas Ghule Case: विलास घुले हत्या प्रकरण, भावाचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'सौरभ सोनवणे यानेच आरोपींना...'

Beed Vilas Ghule Murder Case: बीड जिल्ह्यातील केज येथे घडलेल्या हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणात खासदार पुत्र सौरभ सोनवणे यांच्या अटकेच्या मागणीसाठी घुले कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता.9 जुलै) केजमध्ये न्याय मोर्चा काढत ठिय्या दिला.
Vilas Ghule Murder Case; Bajrang Sonawane son Sourabh Sonawane
Vilas Ghule Murder Case; Bajrang Sonawane son Sourabh Sonawanesarkarnama
Published on
Updated on

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील केज येथे घडलेल्या हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणात खासदार पुत्र सौरभ सोनवणे यांच्या अटकेच्या मागणीसाठी घुले कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता.9 जुलै) केजमध्ये न्याय मोर्चा काढत ठिय्या दिला. सौरभ सोनवणे यानेच विलास घुले यांचा खून करून या, असे आरोपींना सांगितले होते, असा दावा रमेश घुले यांनी केला आहे. चाकूने विलास घुले यांच्यावर हल्ला झाला तेव्हा जखमी अवस्थेत ते स्वतः रुग्णालयात गेले होते. त्यांनी स्वतः घटनास्थळी काय झाले? हे आम्हाला सांगितले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांच्या अटकेची मागणी रमेश घुले यांनी केली आहे. त्यांनी साक्षीदारांनीही या संदर्भात आपले जबाब पुरवणी जबाबात नोंदवले आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून मुख्य आरोपीला अटक करा, घुले कुटुंबियाचा अंत पाहू नका, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

सौरभ सोनवणे याला वाचवण्यासाठी खासदार बजरंग सोनवणे हे पोलीस आणि प्रशासनावर दबाव आणत आहेत, असा आरोपही रमेश घुले यांनी माध्यमांशी बोलताना केला. एसआयटी चौकशी सुरू असली तरी यातील काही अधिकारी हे दबावात काम करत आहेत.

पुरवणी जबाबानुसार कारवाईची आमची मागणी असताना त्या दृष्टीने काहीच हालचाली केल्या जात नाहीत. त्यामुळे एसआयटीमध्ये काही नव्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची आमची मागणी प्रशानाला कळवली होती. परंतु त्यावरही काहीच कारवाई केली गेली नाही. जखमी अवस्थेत असताना माझ्या भावाने स्वतः घटना कशी घडली, तिथे कोण कोण होते? सौरभ सोनवणे यानेच माझा खून करून या, असे आरोपींना सांगितले होते, हे विलास घुले यांनीच आपल्याला सांगितल्याचा दावा केला आहे.

Vilas Ghule Murder Case; Bajrang Sonawane son Sourabh Sonawane
Eknath Khadse News: मोठी बातमी: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंचा पुढचा राजकीय धक्का; ठाकरेंच्या भेटीसाठी थेट गाठली 'मातोश्री'

साक्षीदारांनी तसे जबाब पुरवणी नोंदीत दिले आहे, यापेक्षा आणखी कारवाईसाठी पोलीसांना काय अपेक्षित आहे? असा सवाल रमेश घुले यांनी केला. जोपर्यंत कारवाई संदर्भात ठोस लेखी आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, असा इशाराही रमेश घुले यांनी दिला. सौरभ सोनवणे याला वाचवण्यासाठी खासदार स्वतः पोलीस यंत्रणा, जिल्हा प्रशासनावर दबाव आणत आहेत, याचा पुनरुच्चारही रमेश घुले यांनी केला.

हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांच्या नेतृत्वाखाली केज शहरातून मोर्चा काढण्यात आला. हातात काळे झेंडे, फोटो आणि 'न्याय द्या' च्या घोषणा देत ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. आंदोलकांनी 19 जूनला झालेल्या हत्येप्रकरणात 9 आरोपी अटक झाले असताना मुख्य सूत्रधार अद्याप फरार असल्याचा आरोप केला.

Vilas Ghule Murder Case; Bajrang Sonawane son Sourabh Sonawane
BJP News : भाजपच्या 7 टर्मच्या आमदाराविरोधात पक्षातूनच फिल्डिंग लागली? बड्या नेत्याची फडणवीस वाड्यावर मुख्यमंत्र्यांसोबत खलबतं

प्रभावशाली व्यक्तीचा मुलगा असल्याने सौरभ सोनवणे याला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणासाठी गठीत करण्यात आलेल्या एसआयटीने तात्काळ सौरभ सोनवणे याची चौकशी करून अटक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com