BJP News : सुधीर मुनगंटीवारांविरोधात भाजपमधूनच फिल्डिंग लागली? बड्या नेत्याने फडणवीस वाड्यावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

BJP News : चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते संतोषसिंह रावत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांचे भाजपशी असलेले जुने संबंध आणि सहकारी बँकेतील भरती चौकशीच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण आले आहे
Congress Leader’s Santosh Singh Rawat meets CM Devendra Fadnavis
Congress Leader’s Santosh Singh Rawat meets CM Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

BJP News : भाजपचे माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात आता पक्षातूनच फिल्डिंग लावली जात असल्याची चर्चा आहे. त्यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी मूल येथे कौटुंबिक धार्मिक कार्यक्रमानिमित्त आले होते. फडणवीस वाड्यावर आयोजित या कार्यक्रमासाठी माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे यांच्यासह काही निवडक मान्यवरांना निमंत्रित केले होते.

या निमंत्रितांमध्ये संतोषसिंह रावत यांचाही समावेश होता. रावत हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण माजी मंत्री शोभा फडणवीस यांच्याशी निकटचे संबंध असल्याने रावत हे पत्नीसह कार्यक्रमाला उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत संतोषसिंह रावत बल्लारपूर मतदारसंघातून प्रभावी लढत दिली होती. सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्याविरोधात अवघ्या 25 हजार मतांनी पराभव झाला होता. त्या काळातही त्यांच्या आणि भाजप नेतृत्वातील संबंधांविषयी राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या.

संतोषसिंह रावत यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना मोठ्या प्रमाणावर कर्मचारी भरती प्रक्रिया राबविली होती. या नोकर भरतीच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक गठीत केले आहे. याबाबतही या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Congress Leader’s Santosh Singh Rawat meets CM Devendra Fadnavis
Tukaram Mundhe : दूध भेसळीच्या हॉटस्पॉटवर तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राईक : आठवड्याभरातच उद्ध्वस्त केलं आणखी एक रॅकेट

सध्या काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडी आणि बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर रावत यांच्या या भेटीकडे विशेष उत्सुकतेने पाहिले जात आहे. रावत यांचे पूर्वी भारतीय जनता पक्षाशी संबंध राहिले असल्याने या भेटीचे राजकीय परिणाम काय असू शकतात, याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मात्र, ही भेट केवळ सदिच्छा स्वरूपाची असल्याचे रावत यांच्याकडून सांगितले जात आहे.

Congress Leader’s Santosh Singh Rawat meets CM Devendra Fadnavis
NCP Crisis: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ...'; पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा

पक्षातूनच फिल्डिंग?

सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरमधून तिकीट देण्यात आले होते. पण त्यांना राज्याच्या राजकारणात रस असल्याने त्यांनी लोकसभा निवडणूक नाईजास्ताव लढवली होती. त्यात त्यांचा पराभवही झाला. ओढवून घेतलेल्या पराभवाची शिक्षा म्हणून त्यांना पुढे मंत्रिमंडळातूनही बाहेर ठेवण्यात आले. आता पुढच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्याच विरोधात निवडणूक लढवलेल्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com