Sambhjinagar Constituency : संभाजीनगरात विनोद पाटील भुमरेंशी खेटले, मुख्यमंत्र्यांवर पुन्हा उमेदवार बदलण्याची नामुष्की का?

Lok sabha Election 2024 : मराठा आरक्षणासाठीचे याचिकाकर्ते, आंदोलक म्हणून ज्या विनोद पाटील यांना शिंदेंनी जवळ केले, ते पाटीलच आता शिवसेना उमेदवाराच्या विरोधात बंड करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी ज्या भाजपने शिवसेना शिंदे गटावर दबाव आणून त्यांना अनेक ठिकाणी उमेदवार बदलायला भाग पाडले, त्यांचीशीच हातमिळवणीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
Eknath Shinde-Vinod Patil-Sandipan Bhumre
Eknath Shinde-Vinod Patil-Sandipan BhumreSarkarnama

Chhatrapati Sambhjinagar, 23 April : मतदारसंघ सोडवून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधी मित्रपक्ष भाजपशी झगडावे लागले. छत्रपती संभाजीनगरची जागा आमची आहे, ती आम्हीच लढवणार यावर ठाम राहत मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या दिल्ली आणि राज्यातील नेत्यांना नमते घ्यायला भाग पाडले. आता संभाजीनगर मतदारसंघातून शिवसेनेचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर केली, त्यांनी अर्ज दाखल केला तरी मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी काही थांबत नाही.

मराठा आरक्षणासाठीचे याचिकाकर्ते, आंदोलक म्हणून ज्या विनोद पाटील यांना शिंदेंनी जवळ केले, ते पाटीलच आता शिवसेना उमेदवाराच्या विरोधात बंड करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी ज्या भाजपने शिवसेना शिंदे गटावर दबाव आणून त्यांना अनेक ठिकाणी उमेदवार बदलायला भाग पाडले, त्यांचीशीच हातमिळवणीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde-Vinod Patil-Sandipan Bhumre
Hatkanangle Lok Sabha : शिराळा पुन्हा राजू शेट्टींना भरभक्कम साथ देणार का?; ‘स्वाभिमानी’वरच सर्व भिस्त

एकीकडे महायुती (Mahayuti) भक्कम आहे, उमेदवार कोणीही असला तरी त्याला आम्ही निवडून आणू, असे दावे तीनही पक्षाचे नेते करतात. दुसरीकडे बंडखोरांना बळही देतात, असे काहीसे चित्र सध्या संभाजीनगरात निर्माण झाले आहे. विनोद पाटील (Vinod Patil) यांनी काल नागपुरात जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. मीच कसा योग्य आणि निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार आहे, हे पाटील यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला.

नागपूरहून परतलेल्या पाटील यांनी पुन्हा सर्वे करण्याची मागणी केली. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन भुमरेंच्या उमेदवारीला विरोध दर्शवत फेरविचाराची मागणी केली. त्यामुळे भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी या जागेवरील दावेदारीचा खेळ काही संपलेला नाही. भाजपचा नाइलाज झाल्याने त्यांनी भुमरेंची उमेदवारी तनाने स्वीकारली असली तरी मनाने अद्यापही त्यांची तयारी नसल्याचे स्पष्ट दिसते.

Eknath Shinde-Vinod Patil-Sandipan Bhumre
Lok Sabha Election 2024 : हातकणंगलेत जातीय समीकरणेच ठरणार 'गेमचेंजर'; आजी-माजी खासदार की नव्याला मिळणार संधी?

त्यातच आता विनोद पाटील यांना छुपे बळ देऊन भुमरेंचा खेळ बिघडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना भाजपने छुपी मदत केल्याचा आरोप केला जातो, तशीच परिस्थिती या वेळी निर्माण करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसा तोडगा काढतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भुमरे यांना महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांचे तगडे आव्हान असताना विनोद पाटील यांच्या हट्टाने त्यांचा खेळ बिघडू शकतो. हिंगोली, यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांची जाहीर केलेली उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की मुख्यमंत्र्यांवर ओढावली होती. आता संभाजीनगरात तीच परिस्थिती उद्‌भवणार का? हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल.

Edited By : Vijay Dudhale

R

Eknath Shinde-Vinod Patil-Sandipan Bhumre
Mohol Politics : फडणवीसांचा निकटवर्तीय भाजप नेता बुधवारी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com