Marathwada Lok Sabha Campaign : मराठवाड्याच्या प्रचारसभांमध्ये घुमला मोदी, शाह, ठाकरे, ओवेसींचा आवाज...

Lok Sabha Election 2024 : महायुतीकडून प्रचाराची प्रमुख जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पार पाडली. पंतप्रधान मोदी यांच्या बीड, लातूर, परभणी, नांदेड, धाराशिव जिल्ह्यांत पाच सभा झाल्या. यापैकी काही पूर्वनियोजित होत्या, तर काही ऐनवेळी ठरवण्यात आल्याची चर्चा होती.
Sharad Pawar-Asaduddin Owaisi-Uddhav Thackeray-Narendra Modi
Sharad Pawar-Asaduddin Owaisi-Uddhav Thackeray-Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यात लोकसभेच्या आठ जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान पार पडले. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या दोन प्रमुख पक्षांमध्ये प्रामुख्याने लढत झाली. महायुतीकडून प्रचाराची प्रमुख जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पार पाडली. पंतप्रधान मोदी यांच्या बीड, लातूर, परभणी, नांदेड, धाराशिव जिल्ह्यांत पाच सभा झाल्या. यापैकी काही पूर्वनियोजित होत्या, तर काही ऐनवेळी ठरवण्यात आल्याची चर्चा होती.

त्याखालोखाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जालना, नांदेड जिल्ह्यात प्रचार सभा घेत महाविकास आघाडीवर हल्ला चढवला होता. भाजपच्या प्रचारात प्रामुख्याने शरद पवार, उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्यात आले होते. यात नकली राष्ट्रवादी, नकली शिवसेना, उद्धव ठाकरे यांचा नकली संतान असा उल्लेख केल्याने वातावरण चांगलेच तापले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar-Asaduddin Owaisi-Uddhav Thackeray-Narendra Modi
Modi Cabinet Meeting : मोदींच्या कॅबिनेट बैठका कशा होतात? गडकरींच्या ‘त्या’ किश्श्यासह माजी मंत्र्याने सांगितली इनसाईट स्टोरी

इंडिया आघाडी (India Aghadi), राम मंदिर, तीन तलाक, कलम 370, सीएए सारखे राष्ट्रीय मुद्यांचा पुरेपूर वापर करण्यात आला. या शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परभणी, हिंगोली, जालना, नांदेड, धाराशिव, लातूरमध्ये सभा झाल्या. राज्यातील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या काळातील महाविकास आघाडीचा कारभार, हिंदुत्व, सत्तेसाठी लाचारी या मुद्यावर जोर दिल्याचे दिसून आले.

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रचाराची धुरा ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माजी मंत्री अमित देशमुख यांच्या खांद्यावर होती. राष्ट्रीय स्तरावरून राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी प्रचार सभा घेतल्या होत्या. शरद पवार यांच्या संभाजीनगर एक आणि बीडमध्ये दोन अशा तीन सभा झाल्या. मणिपूर हिंसाचार, महिला अत्याचार, जीएसटी, उद्योगपतींचे सरकार हे मुद्दे या बहिण भावाने उपस्थितीत करत मोदींना टार्गेट केल्याचे दिसून आले होते.

उद्धव ठाकरे यांच्या मराठवाड्यात पाच ते सहा सभा झाल्या. त्यापैकी धाराशिवमध्ये दोन, हिंगोली, परभणीत प्रत्येकी एक, तर संभाजीनगरमध्ये प्रचाराच्या शेवटच्या टप्यात एक सभा झाली. या सभेत ठाकरेंनी नकली शिवसेना, नकली संतान म्हणणाऱ्या मोदींवर निशाणा साधत त्यांचे संस्कार काढले. तसेच हा महाराष्ट्र तुम्हाला पुन्हा दिल्ली पाहू देणार नाही, असा इशाराही दिला होता.

Sharad Pawar-Asaduddin Owaisi-Uddhav Thackeray-Narendra Modi
Sunil Tatkare Explanation : नाशिकमधील ‘त्या’ हॉटेलमध्ये जाण्याचे सुनील तटकरेंनी सांगितले कारण...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतून फुटून गेलेल्या चाळीस आमदारांवर ठाकरे यांनी चांगलेच तोंडसुख घेतल्याचे दिसून आले. या शिवाय वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची संभाजीनगर, नांदेड, लातूरमध्ये सभा झाली. या सभांमधून त्यांनी मोदी सरकारवर चारशे पारचा नारा संविधान बदलासाठीच दिला जात असल्याचा हल्ला चढवत मोदी-शाह यांच्यासह राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर चौफेर टीका केली.

एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांची संभाजीनगर, कन्नड आणि वैजापूर तालुक्यात सभा झाल्या. यात त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि त्यांचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना टार्गेट करत त्यांना मुस्लिमांबद्दल निवडणुकीच्या तोंडावर प्रेम येऊ लागले आहे, अशी टीका केली.

Sharad Pawar-Asaduddin Owaisi-Uddhav Thackeray-Narendra Modi
Pawar-Tatkare News : पवारांचा मुक्काम असलेल्या हॉटेलला तटकरेंची भेट; अनिल देशमुखांचा दुजोरा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com