Sunil Tatkare Explanation : नाशिकमधील ‘त्या’ हॉटेलमध्ये जाण्याचे सुनील तटकरेंनी सांगितले कारण...

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात तुतारीचा पराभव मोठ्या प्रमाणात होणार असल्याने नैराश्याच्या गर्तेत असलेल्या अनिल देशमुख यांनी कदाचित त्यांच्यावर चार वर्षांपूर्वी जी वेळ आली होती, त्यातून ते बाहेर पडले नसतील, त्यामुळे अशा पद्धतीचा सनसनाटी निर्माण करणारा आरोप त्यांनी माझ्यावर केला असावा.
Anil Deshmukh-Sunil Tatkare
Anil Deshmukh-Sunil TatkareSarkarnama

Palghar, 17 May : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे नाशिकमध्ये शरद पवार यांनी ज्या हॉटेलमध्ये मुक्काम केला, त्या हॉटेलला भेट दिल्याची चर्चा आहे, त्यामुळे तटकरे-पवार भेटीचीही चर्चा रंगली आहे. मात्र, त्यावर आता खुद्द सुनील तटकरे यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.

मी दीर्घकाळ लांबून प्रवास करून आलो होतो. नाशिक शहरात असताना मला फ्रेश होण्यासाठी कुठेतरी जायचं होतं. माझ्यासोबत असणारा कार्यकर्ता कम ड्रायव्हरने मला ज्या हॉटेलमध्ये नेलं, त्याच हॉटेलमध्ये योगायागाने शरद पवार (Sharad Pawar) होते. तेथून मी बाहेर पडलो, असे सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Anil Deshmukh-Sunil Tatkare
Solapur, Madha Vote Counting : माढा, सोलापूरच्या मतमोजणीसाठी 672 कर्मचारी; नियुक्त कर्मचाऱ्यांना देणार ट्रेनिंग

तटकरे म्हणाले, हेमंत टकले (Hemant Takle) यांच्याकडे काम करणारा एक कार्यकर्ता रोहा तालुक्यातील चनेरा गावचा उपसरपंच आहे. त्यांनी मला सांगितले की, आमच्या गावातील सर्व मते तुम्हाला पडली आहेत. तुम्हाला मतदान करू नये, असा निरोप आम्हाला देण्यात आला होता. मात्र, आम्ही तुम्हालाच मतदान केले आहे. अफवा पसरविण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे विधान आहे.

महाराष्ट्रात तुतारीचा पराभव मोठ्या प्रमाणात होणार असल्याने नैराश्याच्या गर्तेत असलेल्या अनिल देशमुख यांनी कदाचित त्यांच्यावर चार वर्षांपूर्वी जी वेळ आली होती, त्यातून ते बाहेर पडले नसतील, त्यामुळे अशा पद्धतीचा सनसनाटी निर्माण करणारा आरोप त्यांनी माझ्यावर केला असावा. माझी कोणाशीही भेट होण्याचा प्रश्नच नाही. मी एक विचाराचा कार्यकर्ता असून माझा स्वतःच्या आयडॉलिजीवर विश्वास आहे. नेतृत्वासोबत आम्ही काम करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Anil Deshmukh-Sunil Tatkare
Solapur Politics : भाजपचे युवा नेते, माजी नगरसेवक देवेंद्र कोठेंच्या विरोधात गुन्हा दाखल

माझी छगन भुजबळ आणि महायुतीच्या दोन्ही उमेदवारांसोबत चर्चा झाली. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्याशीही माझे बोलणे झाले आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील छगन भुजबळ, नरळरी झिरवळ, दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, नितीन पवार, सरोज अहिरे हे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा झटून प्रचार करीत आहेत, असा दावाही तटकरे यांनी केला.

Anil Deshmukh-Sunil Tatkare
Pawar-Tatkare News : पवारांचा मुक्काम असलेल्या हॉटेलला तटकरेंची भेट; अनिल देशमुखांचा दुजोरा

देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. सिंचन गैरव्यवहारात सुरुवातीला आम्हाला खरं वाटलं. पण, तपास यंत्रणांच्या चौकशीत अजित पवार आणि सुनील तटकरे यांचा सहभाग आढळून आलेला नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. मी देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो की, त्यांनी ही स्पष्टपणाची भूमिका घेतली. ही चौकशी होऊनही सात ते आठ वर्षे झाली आहेत. पण, याच आरोपाखाली बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, ते किती विफल आहेत, हे दिसून येते.

Anil Deshmukh-Sunil Tatkare
Tatkare-Pawar News : तटकरे, पवार भेटीबाबत उमेश पाटलांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, हा तर योगायोग....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com