Sambhajinagar : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करण्याच्या निर्णयाला केंद्राने मंजुरी दिली. त्यानंतर यावरून राजकारण आणि श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटवर खोचक सवाल केला होता.
फक्त शहराचे नाव बदलले की जिल्ह्याचे हे फडणवीसांनी (Devendra Fadanvis) स्पष्ट करावे, असे ट्विट दानवे यांनी केले होते. (Bjp) त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर देत ` आम्ही अर्धवट काहीच करत नाही, सगळं पुर्णच करतो`, असे म्हणत टोला लगावला.
नामांतराचा निर्णय झाल्यानंतर फडणवीसांच्या ट्विटवर दानवेंनी ट्विट करत हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा. तालुका 'छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद', असे यापुढे लिहावे लागेल का? हे पण सांगावे, असा सवाल केला होता.
त्याला फडणवीसांनी प्रतिउत्तर दिले आहे. अंबादास जी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते. तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' असे नामकरण झाले आहे.
त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल. तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही, असा टोला फडणवीसांनी अंबादास दानवेंना नामांतराची प्रक्रिया समजावून सांगताना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.