Devendra Fadanvis News : फडणवीस यांनी मराठा समाजासाठी काय केलं; कार्यकर्त्याकडून मराठवाड्यात जाहिरातबाजी...

Maratha Reservation देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही, तर ही जाहिरात कशासाठी असा प्रश्नही मराठवाड्यातील मराठा समाजाकडून उपस्थित केला जात आहे.
Manoj Jarange Patil, Devendra Fadanvis
Manoj Jarange Patil, Devendra Fadanvissarkarnama

Devendra Fadanvis News : मनोज जरांगे पाटील यांच्या गंभीर आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला काय दिलं, हे सांगणारी एक जाहिरात आज मराठवाड्यातील स्थानिक दैनिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. श्री. फडणवीस यांचे कार्यकर्ते राजेंद्र साबळे यांच्या नावाने ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यातून आपल्यावर झालेले आरोप पुसण्यासाठी श्री. फडणवीस हे पर्यंत करत असल्याचेही चर्चा आहे.

विशेष म्हणजे या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांचा फोटो हा छत्रपती शिवाजी महाराज यांना हात जोडताना दाखवण्यात आला आहे. त्यावर ‘एक मराठा लाख मराठा’ असं मराठा क्रांती मोर्च्या दरम्यान वापरण्यात आलेले घोष वाक्य ही टाकण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपानंतर फडणवीस यांच्या विरुद्ध मराठा समाजात असंतुष्ट असं वातावरण निर्माण झाल्याने ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.

मराठा आरक्षणप्रश्नावरुन आपल्यावर लागलेला डाग पुसण्यासाठी श्री. फडणवीस यांनी मराठा कार्यकर्त्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करुन घेतल्याचे ही बोलले जात आहे. या जाहिरातीमुळे आपल्यावर केले गेलेले आरोप पुसण्यासाठी हा फडणवीसपर्यंत करत असल्याचीही चर्चा आहे. फडणवीस यांनी काहीच केल नाही, तर ही जाहिरात कशासाठी असं ही प्रश्न आता मराठवाड्यातील मराठा समाजाकडून उपस्थित होत आहे.

Manoj Jarange Patil, Devendra Fadanvis
Maratha Reservation : मोठी बातमी! राज्यात 26 फेब्रुवारीपासूनच मराठा आरक्षण लागू; पण...

त्यामुळे या जाहिरातीवरून उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस हे सध्या मराठवाड्यात चर्चेचा विषय बनले आहेत. या जाहिरातीत नेमक काय आहे, हा प्रश्न सर्वांना पडला असेल. जाहिरातीत म्हटलंय की, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षणाची तरतूद करून दिल्याबद्दल महायुती सरकारचे खूप खूप अभिनंदन..!

या जाहिरातीतत राजेंद्र साबळे पाटील यांनी म्हटलंय की, शिक्षण आणि नोकरीत मराठा समाजाला १० टक्के आरक्षणाची तरतूद करून दिल्याबद्दल महायुती सरकारचे खूप खूप अभिनंदन आहे. आतापर्यंत साडे चार हजार अधिसंख्य पदे भरली आहेत. मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या ४२ आंदोलनकर्त्यांपैकी पात्र ३५ जणांच्या वारसांना एसटीत नोकरी उपलब्ध केली आहे. तसेच ३५ कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत केली आहे.

Manoj Jarange Patil, Devendra Fadanvis
जरांगेंचे ‘ते’ आरोप फडणवीसांनी अधिवेशनात बोलून दाखवले | Devendra Fadnavis | Manoj Jarange Patil |

मराठा समाजातील युवकांना उद्योग व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ वैयक्तिक कर्जव्याज परतावा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यामध्ये एकूण ७७ कोटी ३८ लाख १६ हजार ११२ रुपयांचे कर्ज उपलब्ध केले असून ६३७.८६ कोटी रुपये व्याज परतावा मिळवून दिला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेतून एकूण ६४९ लाभार्थ्यांना १३.१२ कोटींचा व्याज परतावा दिला आहे.

Manoj Jarange Patil, Devendra Fadanvis
Devendra Fadnavis News: जरांगेंनंतर आता ठाकरेंच्या आमदाराचा फडणवीसांवर गंभीर आरोप; म्हणाले,'सुरतला असताना मलाही...'

सारथी राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती योजनेतून युपीएससीत : ५१ उमेदवार यशस्वी झाले आहेत. यामध्ये १२ आयएएस, १८ आयपीएस, आठ आयआरएस, एक आयएफएस, १२ इतर सेवेत यशस्वी झाले आहेत. राज्य लोकसेवा आयोगात ३०४ उमेदवार यशस्वी झाले आहेत. त्यासाठी एकूण २१०९ विद्यार्थ्यांना ८७ कोटी रुपये उपलब्ध केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil, Devendra Fadanvis
Devendra Fadnavis : जरांगेंच्या गंभीर आरोपांनंतर फडणवीसांचं मोठं पाऊल; भाजप आमदारांना दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना

महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा ११ हजार ३९३ विद्यार्थ्यांना ४५ कोटी रुपये कौशल्य प्रशिक्षण दिले आहे. तसेच सारथीतर्फे ३५ हजार ७२६ विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले आहे. ही सर्व माहिती ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, माध्यमिक शाळांमध्ये वितरित करण्यात आली आहे. त्यामुळेच आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत असल्याचे राजेंद्र साबळे पाटील यांनी जाहिरातीत म्हटले आहे.

Edited By : Umesh Bambare

Manoj Jarange Patil, Devendra Fadanvis
एसआयटीकडून चौकशी झाल्यास पुढे काय?, जरांगेंनी प्लॅनिंग सांगून टाकलं | Manoj Jarange Patil |

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com