Cabinet Meeting : मंत्रिमंडळाची बैठक, होणार घोषणांचा पाऊस; मराठवाड्याला काय मिळणार ?

Cabinet Meeting in Chhatrapati Sambhajinagar : सिंचन विभागाचा सर्वाधिक २१ हजार कोटींचा रूपयांचा प्रस्ताव सादर झाला आहे.
Cabinet Meeting in Chatrapati Sambhajinagar :
Cabinet Meeting in Chatrapati Sambhajinagar : Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी आरक्षणाची आग्रही मागणी घेऊन तब्बल १७ दिवस उपोषण आंदोलन केलं. याचं आंदोलनाच्या राज्यभरातील पडसादामुळे सरकार जागं झालं. यामुळे सरकारी यंत्रणांची अक्षरश: झोप उडाली होती . याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मराठवाड्यात महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) पार पडत आहे. (Latest Marathi News)

Cabinet Meeting in Chatrapati Sambhajinagar :
NCP Crisis News : अजित पवारांची बैठकीला दांडी; शरद पवार यांच्यापुढे येणे जाणीवपूर्वक टाळले ?

मागील काही वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचा दाह सहन करावं लागणाऱ्या मराठवाड्याला आज मोठा दिलासा या बैठकीतून मिळण्याची शक्यता आहे. कारण या बैठकीत जवळपास ४० हजार कोटींचं पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने सिंचन, रस्ते विकास प्रकल्प, वैद्यकीय आणि कृषी महाविद्यालयांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

यामध्ये सिंचन विभागाचा सर्वाधिक २१ हजार कोटींचा रूपयांचा प्रस्ताव सादर झाला आहे. काही प्रकल्पांच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा समावेश असल्याची माहिती आहे. यामुळे आज होणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधील राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (What will Marathwada get in the maharashtra cabinet meeting)

Cabinet Meeting in Chatrapati Sambhajinagar :
Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीचा 'फाईव्ह-स्टार' थाट; मुख्यमंत्र्यांसह मंत्री अन् सचिव यांच्या अलिशान वास्तव्याची सोय...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com