

Parbhani Political News : मागील सत्तावीस वर्षांपासून अडगळीत पडलेले महिला आरक्षण विधेयक नऊ वर्षांपूर्वी आणले असते, तर त्यामागे स्वच्छ हेतू आहे, असे म्हणता आले असते. (Women Reservation) मात्र आता आणलेले महिला आरक्षण विधेयक हा भाजपचा केवळ चुनावी जुमला आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट ) राज्यसभेच्या खासदार डॉ. फौजिया खान यांनी केली.
(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअॅप चॅनल जॉईन करा)
भारतीय जनता पक्षाचा स्वच्छ हेतू असता तर त्यांनी हे विधेयक नऊ वर्षांपूर्वी आणले असते व आतापर्यंत त्याची अंमलबजावणी झाली असती. (NCP) मात्र, भाजपने निवडणुकीचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडले आहे. (Parbhani) असे असले तरी आम्ही त्यासाठी संपूर्ण सहकार्य करू.
संसदेच्या एका ऐतिहासिक इमारतीमधून नव्या वास्तूत प्रवेश करताना राष्ट्रपतिपदी महिला असताना त्यांना संधी द्यायला हवी होती. (Marathwada) मात्र, भाजपने त्यांना डावलले हे अतिशय खेदजनक आहे. संसदेच्या जुन्या वास्तूचा निरोप घेताना सरकारकडून सर्व सदस्यांना घटनेची प्रत देण्यात आली.
त्यात धर्मनिरपेक्ष व समाजवाद हे शब्द नाहीत. मागच्या दाराने देशाची घटना बदलण्याच्या हा भाजपचा डाव आहे. यासंदर्भात खरेतर न्यायालयात दाद मागितली गेली पाहिजे, असेही फौजिया खान म्हणाल्या. दरम्यान, मोदी सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात बुधवारी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन विधेयक) बहुमताने मंजूर झाले आहे.
या महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने ४२५ मते पडली, तर या विधेयकाविरोधात दोन मते पडली. त्यामुळे हे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर झाले आहे. आता हे विधेयक गुरुवारी मंजुरीसाठी राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. महिला आरक्षणाच्या या विधेयकावर चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले. एक तृतीयांशपेक्षा जास्त मतांनी हे विधेयक मंजूर झाले आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.