Ashok Chavan News : दोन महिने मागणाऱ्या सरकारने एक महिना दहा दिवस काय केले ?

Maratha Reservation : हा महाराष्ट्राचा सार्वत्रिक विषय असून, केवळ काही हजार नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही.
Ashok Chavan News
Ashok Chavan News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Latest News : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना निर्णय घेण्यासाठी सरकारने एक महिना मागून घेतला होता. (Maharashtra Political News) जरांगे यांनी एक महिना दहा दिवस दिले, तरीही सरकारला आणखी वेळ हवा आहे. मग गेल्या एक महिना दहा दिवस सरकारने काय केले? असा सवाल माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.

Ashok Chavan News
Maratha protesters: मराठा आरक्षणाची धग आता दिल्ली दरबारी; जंतर-मंतर येथील आंदोलन दडपण्याचा पोलिसांचा प्रयत्न

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन केली. (Maratha Reservation) त्यानंतर माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मराठा आरक्षण व अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेले बेमुदत उपोषण या प्रश्नावर आपले मत मांडले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारला आणखी वेळ द्यावा, असे आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले होते. (Congress) यावर प्रश्न विचारला असता, अशोक चव्हाण यांनी एक महिना दहा दिवस सरकारने काय केले? याचे उत्तर दिले पाहिजे. त्या काळात निर्णय घेण्यात तुम्हाला काय अडचणी आल्या हे लोकांना कळायला पाहिजे. त्याशिवाय तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार? असा प्रश्न उपस्थितीत केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारने आतापर्यंत केले काय?

मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांना आणखी दोन महिन्यांचा वेळ मागते आहे. मात्र, यापूर्वी दिलेल्या १ महिने १० दिवसांच्या कालावधीत सरकारने नेमके काय केले, ते महाराष्ट्राला कळाले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मागील महिनाभरात कोणत्या अडचणी समोर आल्या तेसुद्धा स्पष्ट झाले पाहिजे, अशी मागणीही अशोक चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केले की माजी न्या. संदीप शिंदे समितीने १ कोटी ७२ लाख कागदपत्रे तपासली.

त्यामध्ये ११ हजार ५३० दस्तावेजांमध्ये कुणबी असल्याच्या नोंदी आढळून आल्या. त्याआधारे कुणबी प्रमाणपत्र मिळत असेल तर आमची तक्रार नाही. मात्र, त्यातून ना संपूर्ण मराठवाड्यातील मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागेल, ना राज्याचे इतर विभाग पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण व विदर्भातील मराठा समाजाला न्याय मिळेल ! हा महाराष्ट्राचा सार्वत्रिक विषय असून, केवळ काही हजार नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असे परखड मतही चव्हाण यांनी मांडले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.