Suresh Dhas On Munde Resign धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागत नाही?; सुरेश धसांनी डेडलाईनच दिली.... (Video)

Santosh Deshmukh Murder Case : सुरेश धस यांनी आतापर्यंत केलेल्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागताच तोही होईल का, यावर सुरेश धस म्हणाले, असं काही होईल, असं मला वाटत नाही.
Santosh Deshmukh-Suresh Dhas-Dhananjay Munde
Santosh Deshmukh-Suresh Dhas-Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed, 09 February : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मी अजून मागितलेला नाही. आणखी काही दिवस, तो जो तपास सुरू आहे, त्यात आतापर्यंतच्या तपासात ‘आका’पर्यंत (वाल्मीक कराड) एसआयटी गेलेली आहे. पण, एसआयटीचा तपास ‘आका’च्या पुढं गेल्यानंतर मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलू, असे विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केले आहे.

बीडमध्ये माध्यमांशी बोलताना सुरेश धस (Suresh Dhas) यांनी हे विधान केले आहे. ते म्हणाले, समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, करुणा मुंडे ह्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत काय म्हणतात, त्या पेक्षा त्यांच्याच पक्षातील आमदार बऱ्यापैकी करत आहेत. आमच्याच बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळुंखे यांनीही धनंजय मुंडे यांना पदापासून दूर राहावे, अशी मागणी केली आहे.

अनेक संघटनाही धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. जिथं जिथं मोर्चे निघत आहेत. त्यात मोर्चातही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. पण, मी स्वतः अजूनही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही, असेही सुरेश धस यांनी स्पष्ट केले.

Santosh Deshmukh-Suresh Dhas-Dhananjay Munde
Solapurkar controversial statement : राहुल सोलापूरकरांचे आणखी एक वाद्‌ग्रस्त विधान व्हायरल; डॉ. आंबेडकरांचे अनुयायी आक्रमक!

सुरेश धस यांनी आतापर्यंत केलेल्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागताच तोही होईल का, यावर सुरेश धस म्हणाले, असं काही होईल, असं मला वाटत नाही. पण, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा की नाही घ्यावा, हे सर्वस्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हातात आहे. या तिघांनी मनात आणलं, तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा होऊ शकतो.

Santosh Deshmukh-Suresh Dhas-Dhananjay Munde
Barshi Politic's : सोलापुरातील कट्टर राजकीय विरोधकांचा एसटीतून एकत्र प्रवास; दावे मात्र वेगवेगळे!

आमचं काय, त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते आहे. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रॉग बॉक्समध्ये चालला आहे. आम्ही (भाजप) पॉझिटिव्ह बॉक्समध्ये चाललो आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुख खून प्रकरणी सर्व बाजू जनतेसमोर पॉझिटिव्ह कशा जातील, हेच पाहिले आहे. संतोष देशमुख खूनप्रकरणी एसआयटीची मागणी केली, तर एसआयटी स्थापन केली. तसेच, आरोपींना मोकाही लावला आहे. दहा लाखांची मदतही केली, त्यामुळे आमच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व गोष्टी केलेल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com