Assembly Winter Session : राणेंच्या आरोपानंतर भुसे, शेलार आक्रमक; फडणवीसांनी केली SIT चौकशीची घोषणा

Devendra Fadnavis' announcement : शिवसेना भवन उडवण्याच्या कटातही हा सलीम कुत्ता समाविष्ठ होता.
 Devendra Fadnavis-Ashish Shelar-Dada Bhuse
Devendra Fadnavis-Ashish Shelar-Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : आमदार नीतेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी करत असतानाचा फोटो विधानसभेत झळकावला. त्यानंतर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही उबाठा गटावर हल्लाबोल करत या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पार्टी प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा केली. (Salim Kutta-Badgujar party case probed by SIT : Fadnavis' announcement)

नीतेश राणे यांनी सलीम कुत्ता आणि नाशिकचे शिवसेना शहर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या पार्टीतील फोटो विधानसभेत दाखवून ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नाशिकचे पालकमंत्री तथा शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

 Devendra Fadnavis-Ashish Shelar-Dada Bhuse
Nagpur Winter Session : बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी; राणेंनी विधानसभेत झळकावला फोटो

दादा भुसे म्हणाले की, नीलेश राणे यांनी महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. भारताचा एक नंबरचा शत्रू दाऊद इब्राहिम याचा शार्पशूटर , ज्याने बॉम्बस्फोट घडविले. त्या बाम्बस्फोटात दोनशेपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. एवढं नाही तर शिवसेना भवन उडवण्याच्या कटातही हा सलीम कुत्ता समाविष्ठ होता. हा व्यक्ती नाशिकचे शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासोबत डान्स पार्टी करतो. बडगुजरही काही दिवसांपूर्वी पोट भरण्यासाठी नाशिकमध्ये आले आणि शेकडो कोटीच्या प्रॉपर्टीचे मालक झाले आहेत.

राणे यांच्याकडून सध्या जे काही एकलं आहे, ते अतिशय गंभीर आहे. त्यांच्या फार्महाऊसवर काय गाणी काय डान्स. त्याच्यासोबत आणखी कोण कोण सामाविष्ठ आहे. अतिरेक्यांना पैसे कोण पुरवतं. त्याचे लागेबांधे कोणाशी आहेत. बडगुजर हा छोटा मासा आहे. त्याला कोणाचा वरदहस्त आहे. याच्या खोलात जाऊन चौकशी करावी. हे देशद्रोही कृत्य आहे. काही पुरावे नष्ट होण्याचा संभव आहे, त्यामुळे तातडीने कारवाई करावी, अशी मागणी भुसे यांनी केली.

 Devendra Fadnavis-Ashish Shelar-Dada Bhuse
Chhagan Bhujbal : मी फार मोठी लोकं अंगावर घेतलीत, तू किस झाड की पत्ती है! भुजबळांचे जरांगेना चॅलेंज

आशिष शेलार म्हणाले की, सलीम कुत्ता हा निळ्या रेंज रोव्होरमधून आला. त्याची अपॉईमेंट कोणी केली, याचे नावही आम्हाला माहिती आहे, पण ते नाव आम्ही घेत नाही.महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून पेग, पेंग्विन आणि पार्टी याचं मोठ वलय निर्माण झाले आहे. मुंबई स्फोटातील आरोपी कुत्ता याच्यासोबत डान्स करायचा. त्या व्यक्तीला पदावर बसवायचं आणि हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या. हा किळसवाणा प्रकार आहे.

 Devendra Fadnavis-Ashish Shelar-Dada Bhuse
Assembly Winter Session : पहिल्याच मिनिटांत जाधवांनी सरकारला चूक कबूल करायला लावले...फडणवीसांनीही मान्य केले...

सलीम कुत्ता, सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशा पद्धतीच्या घटनांमध्ये अतिरेक्यांचा विश्वास वाढतो. आम्हाला राजकीय वरदहस्त आहे. आमचं कोण काय करू शकत नाही, असं त्यांना वाटतं. या प्रकरणाची चौकशी करावी. तसेच त्या कुत्याला जी बिल्ली समर्थन देते, असे म्हणत बडगुजरला अटक करण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

नीतेश राणे, दादा भुसे, आशिष शेलार यांनी जो विषय उपस्थित केला आहे. तो विषय अतिशय गंभीर आहे. दाऊदच्या जवळचा सहकारी कुत्ता याच्यासोबत पार्टी करणे गंभीर आहे. पॅरोलवर असणाऱ्या व्यक्तीला पार्टी करता येत नाही. त्या व्यक्तीशी बडगुजर यांचा काय संबंध आहे, हे तपासण्यात येईल. त्या पार्टीत कोण कोण होते. त्या पार्टीला कोणाचा वरदहस्त होता, हे ही तपासले जाईल. बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत कोणी पार्टी करत असेल तर संवदेना मेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा फडणवीस यांनी विधानसभेत केली.

 Devendra Fadnavis-Ashish Shelar-Dada Bhuse
Dharashiv Loksabha News : 'मित्रपक्षांना दावा करण्याचा अधिकार, मात्र 'धाराशिव'बाबत निर्णय नाही' ; राणाजगजितसिंह म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com