Pankaja Munde: ताई तुम्ही वेगळा राजकीय पक्ष काढा; भर कार्यक्रमात पंकजा मुंडेंकडे कार्यकर्त्याची मागणी

Pankaja Munde News: भाजप नेत्या पंकजा मुंडे अमित शाह यांची भेट घेणार
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज (दि.3 जून) गोपीनाथ गड येथे जावून अभिवादन केलं. यावेळी पंकजा मुंडे यांनी धडाकेबाज भाषण करत नाराज असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

याबरोबरच राजकारणात कधी कधी किर्तनही करावं लागतं, असं सूचक वक्तव्यही पंकजा मुंडे यांनी केलं. मात्र, पंकजा मुंडे भाषण करत असतानाच त्यांच्या एका कार्यकर्त्यांने "ताई तुम्ही वेगळा राजकीय पक्ष काढा",अशी मागणी केली. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde on BJP: लहानांकडून काय अपेक्षा करणार..? पंकजा मुंडेंचा टोला कुणाला

पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आहेत. यातच त्यांच्या कार्यकर्यांने केलेल्या वेगळा राजकीय पक्ष काढण्याच्या मागणीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पंकजा मुंडे यांचे भाषण सुरू असतानाच खाली बसलेल्या एका कार्यकर्त्यांने उभा राहत "ताई तुम्ही स्वतःचा पक्ष काढा, तण देऊ, मन देऊ, रक्त देऊ, सर्व काही देऊ, असं म्हणत वेगळा राजकीय पक्ष काढण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देत "तुम्ही माझी जास्त काळजी करु नका", असं म्हणl पंकजा मुंडे यांनी जास्त काही न बोलता आपलं भाषण पुढे सुरू ठेवलं.

Pankaja Munde
Eknath Khadse on Pankaja Munde News : पंकजांचा भाजपमध्ये मानसिक छळ, त्यांना पक्षातून बाहेर पडण्यास प्रवृत्त केल जातायं..

दरम्यान, यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "मी मनात काही साठवून ठेवत नाही. मी अमित शाह यांची भेट घेणार आहे. माझ्या खांद्यावर अनेक बंदूका विसावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे राजकारणात कधी-कधी किर्तनही करावं लागतं", असं म्हणत यावेळी त्यांनी आपल्या भाषणात रामायण आणि महाभारतातील काही दाखले दिले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.